कानपुर देहात (उत्तर प्रदेश ) - भोगनीपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील मऊ मुगलपूर रोडवर ट्रॉली पलटल्याने ६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात ओव्हरलोडिंगमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एका ट्रॉलीमध्ये मजूर आपल्या कामासाठी इटावाला निघाले होते. तेव्हा मऊ मुगलपूर रोडवर ही ट्रॉली पलटली. यात ६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हा अपघात ओव्हरलोडिंगमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात झाल्यानंतर या रस्त्यावरिल वाहतूक काही वेळ खोळंबली होती.
हेही वाचा - CORONA Vaccination : पंतप्रधान मोदींसह देशभरातील 'या' नेत्यांनी घेतली कोरोना लस
हेही वाचा - CORONA Vaccination : नरेंद्र मोदी, शरद पवारांसह अनेक दिग्गज नेत्यांनी घेतली लस