सारण : बिहारमध्ये दारूबंदी असूनही सारणमध्ये बनावट दारू पिल्याने सातत्याने मृत्यू होत आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दारू प्यायल्याने 25 जणांची दृष्टी गेली आहे. आतापर्यंत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला ( Nine Died In Saran ) आहे. यापूर्वी 4 जणांचा मृत्यू झाला होता. उपचारासाठी पाटणा मेडिकल कॉलजे हॉस्पिटल येथे ( PMCH ) आणताना 2 जणांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. तपासणी अहवालानुसार आजारी व्यक्तींमध्ये मिथेनॉल विषबाधा असल्याची माहिती मिळत आहे. तथापि, यासंदर्भात अद्याप या प्रकरणी अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
25 जणांना नेत्रदोष : लोकांची गंभीर प्रकृती पाहता छपरा आणि पाटणा रुग्णालयात पाठविण्यात आले. यादरम्यान छपरामध्येच ४ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तब्येत ढासळू लागल्यावर कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. दारू स्वस्त केल्यामुळे लोक भरपूर प्यायले. त्यामुळे लोक आजारी पडले. सकाळी लोकांनी न दिसल्याची तक्रार केली. उलट्या आणि चक्करही येऊ लागली. जेव्हा ते छपरा सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा काही लोकांना पाटणा येथील पीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले.
दारू खूप निकृष्ट दर्जाची - फुलवारिया गावातील एका स्थानिकाने सांगितले की, दारू खूप निकृष्ट दर्जाची होती. दारू पिणाऱ्यांची प्रकृती सकाळपर्यंत ढासळू लागली. सकाळी लोक बोलू लागले, भाऊ, आम्हाला दिसत नाहीये. फुलवारिया गावातील कमल महतो आणि चंदन कुमार या दोघांचे प्राण घरीच गेले होते. 20 पेक्षा जास्त लोकांना डोळ्यांनी दिसू शकत नाही.
सरनच्या जिल्हादंडाधिकारी यांनी सांगितले की, काही लोकांनी विषारी दारुचे सेवन केले होते. त्यामुळे अनेक लोक आजारी पडले. सर्वांवर उपचार सुरू आहेत. विषारी दारु प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. फुलवारिया गावात वैद्यकीय पथक पाठवून त्यांची तपासणी केली. पीएमसीएचमध्ये आतापर्यंत तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये आतापर्यंत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आम्ही गावात वैद्यकीय पथक पाठवले आहे. जेणेकरून घरांमध्ये आजारी असलेल्यांवर उपचार करता येतील. आम्हाला दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 5 लोक रुग्णालयात आले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - Cabinet Expansion Of Shinde Govt: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी