ETV Bharat / bharat

उन्नावमध्ये गंगेकिनारी वाळूतच पुरले जातायत मृतदेह; आता त्यासाठीही जागा नाही शिल्लक

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात उन्नावमध्ये गंगेकिनारी दफन करण्यासाठी ३००हून अधिक मृतदेह आणण्यात आले. या मृतदेहांना नदीकिनारी वाळूतच खड्डा खणून दफन केले जाते. एवढ्या संख्येत मृतदेह आढळत असल्यामुळे आता त्यासाठी जागाही शिल्लक नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. बक्सर आणि रौतापुरमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे.

many-dead-bodies-buried-in-sand-on-ganga-ghat-in-unnao
उन्नावमध्ये गंगेकिनारी वाळूतच पुरले जातायत मृतदेह; आता त्यासाठीही जागा नाही शिल्लक
author img

By

Published : May 13, 2021, 12:21 PM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचे बळी जात आहेत. ही संख्या एवढी आहे, की स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही शिल्लक राहत नाही. तसेच, अग्नी देऊन अंत्यसंस्कार करणे खर्चिक असल्यामुळे, लोक आता गंगेकिनारी वाळूतच मृतदेहांना दफन करत अंत्यविधी पार पाडत आहेत. मात्र आता त्यासाठीही जागा शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे.

उन्नावमध्ये गंगेकिनारी वाळूतच पुरले जातायत मृतदेह; आता त्यासाठीही जागा नाही शिल्लक

उन्नावमध्ये एका महिन्यात ३०० मृतदेहांचे दफन..

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात उन्नावमध्ये गंगेकिनारी दफन करण्यासाठी ३००हून अधिक मृतदेह आणण्यात आले. या मृतदेहांना नदीकिनारी वाळूतच खड्डा खणून दफन केले जाते. एवढ्या संख्येत मृतदेह आढळत असल्यामुळे आता त्यासाठी जागाही शिल्लक नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. बक्सर आणि रौतापुरमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे.

दररोज येतायत सुमारे ३० मृतदेह..

घाटाशेजारी जनावरे चरण्यासाठी दररोज येणाऱ्या एका युवकाने सांगितले, की रोज इथे सुमारे ३० मृतदेह येत आहेत. यापूर्वी महिन्याला केवळ एक-दोन मृतदेह येत होते. याठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने मृतदेह आणले जात असल्यामुळे शेजारच्या गावांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर..

या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याचेही दिसून आले. त्यामुळे खाद्यासाठी जर या कुत्र्यांनी एखाद्या मृतदेहाचा खड्डा खणून तो बाहेर काढला, तर त्यामार्फत कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे उन्नावचे जिल्हा दंडाधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : बक्सर : नाथ बाबा घाटावर मिळाले आणखी आठ मृतदेह; गंगेतून आले वाहत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.