आसाम: मणिपूरमध्ये हिंसाचार होण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. आज परत एका चर्चेमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी चर्चमध्ये गोळीबार केला आहे. इंफाळच्या पूर्व भागामधील खमेनलोक येथील चर्चमध्ये मंगळवारी रात्री गोळीबार झाला. या चर्चमध्ये 25 पेक्षा जास्त लोक होते. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना सध्या इंफाळ येथील राज मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कुकी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे. मणिपूरचे आयपीआरओ हेसनम बालकृष्णन यांनी ईटीव्ही भारतला याविषयची पुष्टी केली आहे. पाच दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील कुकी गावात हल्ला केला होता. या हल्ल्यात एका वृद्ध महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका ६७ वर्षीय महिलेचाही समावेश होता. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने मणिपूर सरकारने अधिसूचित केलेल्या जातीय हिंसाचाराच्या सहा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.
मीतेई आणि कुकीमध्ये हिंसाचार : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मणिपूरमधील मीतेई आणि कुकी जमातीमध्ये हिंसाचार पेटला होता. या हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये मीतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमधील वांशिक हिंसाचारात किमान 100 लोक ठार झाले आहेत तर 310 जण जखमी झाले आहेत. मीतेई जमातीला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा. या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आला होता त्यानंतर तेथे हिंसाचार उफाळून आला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याची विनंती केली होती. दरम्यान मणिपूरच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के लोकसंख्या मीतेईस आहे आणि ते बहुतेक इंफाळ खोऱ्यात राहतात. आदिवासी नागास आणि कुकी लोकसंख्येच्या आणखी 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.
हेही वाचा-