मंगळवार हा दिवस मारुतीरायाचा अर्थात भगवान हनुमानचा आहे. मंगळवारी श्रीरामाचे परमभक्त भगवान संकटमोचन हनुमान यांची पूजा केल्यास, विशेष लाभ होतो. भगवान हनुमान म्हणजेच बजरंगबलीची कृपा ज्याच्यावर असेल त्या व्यक्तीला अडचणी-अडथळे भेडसावत नाहीत. एखादी अडचण आलीच तर त्यावर लवकर मार्ग सापडतो आणि पूढचा काळ चांगला जातो. वाईट शक्तींचा त्रास होत नाही. भगवान हनुमानजीची कृपा राहावी, यासाठी 'हे' उपाय करा.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावा : दर मंगळवारी भगवान हनुमानजीची मनोभावे पूजा करावी. हनुमानाला रुईची पानं आणि तेल अर्पण करावे. हनुमानासमोर सकाळी तुपाचा दिवा तर, संध्याकाळी तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. दिव्यासाठी कलावाची वात तयार करून वापरावी.
प्रसाद नैवेद्य दाखवा : हनुमानाला बुंदीच्या लाडवांचा अथवा चण्याच्या डाळीपासून तयार केलेल्या लाडवांचा प्रसाद अर्पण करावा. अथवा केशरी पेढ्यांचा प्रसाद आणि चन्याचा प्रसाद अर्पण करावा. कुठलाही प्रसाद हा आंघोळ करुन तयार केलेला हवा.
चमेलीचे तेल : शेंदूर आणि चमेलीचे तेल यांचे मिश्रण करून तयार केलेला ओला शेंदूर वापरून हनुमानाच्या मूर्तीला व्यवस्थित लेपन करावे. नंतर भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी. पूजा करतांना आपल्या हाताने कुठलीही चुक होणार नाही, हे लक्षात घ्यावे.
नामस्मरण करावे : रामाचे नामस्मरण करत 108 तुळीशीची पाने भगवान हनुमानाला वाहावी. प्रत्येक पान वाहताना एकदा रामाचे नाव घेऊन तुळशीचे पान हनुमानाला वाहावे. हनुमानाच्या गळ्यात तुळशीच्या पानांचा हार तसेच रुईच्या पानांचा हार घालावा. नंतर भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी. यामुळे भगवान हनुमान तसेच मंगळ प्रसन्न होईल.
प्राण्यांवर दया करा : माकडांना तसेच गायींना भाजलेले चणे, गूळ हे पदार्थ खाऊ घाला. यामुळे भगवान हनुमान प्रसन्न होतील आणि आपला मंगळ कमकुवत असल्यास त्यामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल. मंगळ दोषातून लवकर सुटका होऊ शकेल. तसेच दर मंगळवारी यथाशक्ति दान करावे. शक्यतो गरजूंना गहू, तांदूळ, डाळी, गुळ, नारळ, ताजी फळे अशा स्वरुपात दान करावे.
कोणता दिवस कोणत्या देवाचा : आठवड्यातील सात दिवसांपैकी कोणता दिवस कोणत्या देवाचा आहे, ते जाणून घेऊया. जसे सोमवार - शंकर आणि चंद्र देव (चंद्र ग्रह), मंगळवार - हनुमान आणि मंगळ ग्रह, बुधवार - गणपती आणि बुध ग्रह, गुरुवार - विष्णू आणि गुरू ग्रह, शुक्रवार - माता लक्ष्मी, दुर्गा माता, महालक्ष्मी, संतोषी माता, वैभव लक्ष्मी आणि शुक्र ग्रह, शनिवार - शनि देव आणि शनि ग्रह, रविवार - सूर्य देव.