करीमनगर (तेलंगणा) : येथील जगतियाल जिल्ह्यात मंगळवारी मधमाशांच्या थव्याने केलेल्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू ( Man Killed in Bee Attack ) झाला, तर अन्य 10 जण जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चांगलीच धावपळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंगापूर पोलीस हद्दीतील रेचपल्ली गावाच्या हद्दीत सुमारे 20 कुटुंबे पारंपारिक सण साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. "ते उत्सवात व्यस्त असताना अचानक मधमाशांचा थवा बाहेर आला आणि त्यांनी काहींना चावा घेतला," असे पोलिस निरीक्षक जे रामकृष्ण यांनी सांगितले.
मधमाशांच्या हल्ल्यात रेचपल्ली येथील जी भीमैया (80) यांचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना जगतियाल येथील सरकारी मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले, जेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.