ETV Bharat / bharat

सौदी अरेबियामधून भारतात परतण्याकरिता मदत करा; वाहन चालकाची भावनिक हाक - Indian national trapped in Saudi Arabia

सौदी अरेबियामध्ये भारतीय वाहन चालकाचे हाल होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या वाहन चालकाने मदत करण्याचे थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना विनंती केली आहे.

रुखसार खान
रुखसार खान
author img

By

Published : Jun 18, 2021, 3:03 PM IST

लखनौ- सौदी अरेबियामध्ये नोकरी करण्यासाठी अनेक अकुशल कामगार जातात. मात्र, तिथे त्यांचे अनेकदा हाल होतात. अशीच स्थिती दर्शविणारा वाहनचालकाचा व्हिडिओ समोर आला आहे. या वाहन चालकाने सौदी अरेबियामधून मायदेशी परतण्यासाठी कळकळीची विनंती केली आहे.

रुखसार खान हे उत्तर प्रदेशमधील पदार्थपूर गावांमधील रहिवाशी आहेत. वाहन चालकाची नोकरी करण्याकरिता रुखसार हे चार वर्षांपूर्वी सौदी अरेबियामध्ये गेले. मात्र, तिथे त्यांना अनेकक अडचणींना सामोरे जावे लागल्याची आपबीती त्यांनी व्हिडिओमधून सांगितली आहे.

सौदी अरेबियामधून भारतात परतण्याकरिता मदत करा

हेही वाचा-डॉक्टरांवरील हिंसाचाराविरोधात 10 लाख डॉक्टरांचे शुक्रवारी निषेध आंदोलन

उपाशीपोटी फुटपाथवर घालविल्या रात्री-

नोकरीत घेणाऱ्या मालकाने 'काफील' असे संबोधून पासपोर्ट आणि व्हिसा हिसकावून घेतल्याचे खान यांनी व्हिडिओमध्ये सांगितले. तसेच मालकाने वेतन देण्यासही नकार दिला आहे. हातात पैसे नसल्याने तहानेने व्याकुळ आणि भुकेल्या स्थितीत त्यांना पार्क आणि फुटपाथवर अनेक रात्री काढल्या आहेत.

हेही वाचा-कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे उत्पादनात 2 लाख कोटींचे नुकसान : आरबीआय लेख

पंतप्रधान व मुख्यमंत्री योगी यांनाही केले मदतीचे आवाहन-

खान यांनी व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना भारतामध्ये आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यांची मदत अकिला बेगम म्हणाल्या, की रुखान हा चार वर्षांपूर्वी सौदी अरेबियाला गेला होता. सुरुवातीला त्याला नासीर नावाच्या व्यक्तीने दर महिना १,५०० रियाल्स वेतन दिले.

वेतनही नाही व कागदपत्रेही नाहीत...

त्यानंतर नासीर यांनी दुसऱ्या व्यक्तीसाठी काम करण्याविषयी रुखसार याला सांगितले. त्यानंतर रुखसार यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. दुसऱ्या मालकाने त्यांना काही महिने वेतन दिले नाही. उलट महत्त्वाची कागदपत्रेही काढून घेतली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.