ETV Bharat / bharat

Kilpauk Stubbing Incident: लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर चाकूने हल्ला - man stabbed young woman who refused marriage

तपासात समोर आले आहे की, तरुणाने फेसबुकवर तरुणीशी मैत्री केली आणि नंतर तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. तिने त्याला नकार दिला त्याने तिला ठार मारण्याची योजना आखली.(Kerala girl stabbed in Kilpauk) (Kilpauk stubbing incident).

लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर चाकूने हल्ला

author img

By

Published : Nov 17, 2022, 4:26 PM IST

चेन्नई - तामिळनाडूतील चेन्नईमधील किलपॉक भागात लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या तरुणीवर चाकूहल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. नवीन (२५) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी वेपेरी येथून अटक केली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने नवीनने केरळमधील सोनू जोसेफ (२०) या मुलीवर चाकूने वार केले. (youth stabs girl in Tamil Nadus Kilpauk). ती किलपॉक येथील एका खाजगी रेस्टॉरंटमध्ये इंटर्नशिप करत होती व तिला एअर होस्टेस बनण्याची इच्छा आहे. (Kerala girl stabbed in Kilpauk) (Kilpauk stubbing incident).

तोंडावर दारूच्या बाटलीने वार केले - 14 नोव्हेंबरच्या रात्री सोनू आपले काम संपवून अबुबेलस रेस्टॉरंटच्या मागे हॉस्टेलकडे जात असताना नवीनने तिला थांबवले आणि तिच्याशी वाद घातला. संतप्त झालेल्या नवीनने सोनूच्या तोंडावर दारूच्या बाटलीने वार केले आणि त्यानंतर ती जमिनीवर बेशुद्ध पडली. नवीनने बाटली फोडून तिच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर वार केले. सोनू जोसेफने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे लोक घटनास्थळी आले आणि नवीनने तेथून पळ काढला. सोनूची सुटका करून तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे तिच्या चेहऱ्यावर, मानेला आणि हाताला 25 टाके पडले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नवीनला वेपेरी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान नवीनने सांगितले की, त्याने सोनूशी फेसबुकवर मैत्री केली आणि चार महिन्यांपूर्वी तिला चेन्नई विमानतळावर भेटला. नवीनने नंतर सोनूला प्रपोज केले. तिने तो प्रस्ताव नाकारला ज्यामुळे तो संतप्त झाला आणि त्याने तिला ठार मारण्याची योजना आखली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.