हैदराबाद : मांचलमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला लैंगिक गुन्ह्यांपासून विशेष संरक्षण कायदा (पॉक्सो) न्यायालयाने ( hyderabad POCSO Court ) गुरुवारी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश हरीशा यांनी मंचलचा रहिवासी दुसारी राजू उर्फ कटम राजू या आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला 20,000 रुपयांचा दंडही ठोठावला.( 20 Year Imprisonment For Sexually Assaulting )
4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार : ही घटना 2016 ची आहे. मंचल पोलिसांना 5 फेब्रुवारी रोजी एका 24 वर्षीय तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त झाली, ज्यामध्ये तिने सांगितले की, कटम राजूने तिच्या 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मांचल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कटम राजूने मुलीला पैसे देण्याच्या बहाण्याने जवळच्या घरात नेले आणि ती खेळत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
मुलीला दाखवली पैशाचे आमिष : फिर्यादीत म्हटले आहे की, 4 फेब्रुवारी रोजी पुन्हा आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने त्याच्यापासून पळ काढला आणि संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली. याप्रकरणी मंचल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान मंचल पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने पुरावे गोळा केले.
२० वर्षे कारावास आणि २० हजार रुपये दंड : आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी एक पोलीस अधिकारी एम गंगाधर यांनी आरोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणावर सुनावणी करताना एलबी नगर येथील विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश हरीशा यांनी आरोपी दुसारी राजू याला २० वर्षे कारावास आणि २० हजार रुपये दंड ठोठावला.