ETV Bharat / bharat

Shocking incident : पत्नीचा निर्घृण खून, धडावेगळे केलेले शिर घेऊन स्वतःच पोहोचला पोलिस ठाण्यात - इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

आपल्याच पत्नीचा शिरच्छेद ( Beheading of wife ) करीत तिचे कापलेले डोके घेऊन जवळच्या पोलीस चौकीत एक व्यक्ती जाऊन पोहोचला. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेचा ( Trembling Event ) व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल ( Video Viral ) झाला आहे. अत्यंत थंड डोक्याने त्याने हे अमानवी कृत्य केले आहे. शुचला माझी असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना ओडिशातील गांदिया येथील चंद्रशेखरपूर गावात घडली आहे.

Shocking incident
Shocking incident
author img

By

Published : Jul 15, 2022, 10:28 AM IST

ढेंकनाल : कौर्याची परिसीमा काय असते ते ओडीशामध्ये घडलेल्या घटनेवरून दिसून आले. स्वतःच्या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून करीत एक व्यक्तीने तिचे शिर धडावेगळे ( Beheading of wife ) केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर कापलेले शिर घेऊन जवळच्या पोलीस चौकीत तो हजर झाला. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेचा ( Trembling Event ) व्हिडिओ व्हायरल झाला ( Video Viral ) आहे. नाकाफोडी माझी असे या नराधमाचे नाव असून त्याच्या क्रौर्याची बळी ठललेल्या महिलेचे नाव शुचला माझी असे आहे. ही घटना ओडिसातील गांदिया येथील चंद्रशेखरपूर गावात घडली आहे.

संशयावरून केला खून - नाकाफोडी माझी याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला होता. तेवढ्यावरून त्याने आपला विश्वासघात झाल्याचे म्हणत पत्नीचा निर्घृण खून केला. पत्नीचा खून करूनच तो थांबला नाही तर त्याने तिचे शिर धडावेगळे करून ते घेऊन 12 किलोमीटर अंतर पायी चातल तो पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. वाटेत त्याचे हे क्रौर्य पाहणाऱ्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला. तो पोलिस स्टेशनला पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी या घटनेची वर्दी पोलिस स्टेशनला दिली होती.

आरोपी अटक - पत्नीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात नाकाफोडी माझी पोहोचलेला पाहून पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी मृतदेह आणि नाकाफोडीला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा तातडीने पंचनामा केला. या धक्कादायक घटनेचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - गोटाबाया के देश छोड़ने में भारत की भूमिका नहीं : विदेश मंत्रालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.