ETV Bharat / bharat

Man Killed Wife Daughter : थरारक! पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीनं निर्घृण हत्या, पती कॅमेऱ्यासमोर म्हणाला... - आसाम क्राइम न्यूज

Man Killed Wife Daughter : आसामच्या बारापेटा जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका पतीनं आपल्या पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या केली. हत्येनंतरचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

crime
crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 9:00 PM IST

बारपेटा (आसाम) Man Killed Wife Daughter : 'सहनशीलतेची मर्यादा असते!' पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीनं हे चक्क कॅमेरासमोर सांगितलं! आसाममधील बारपेटा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी हत्येची एक भीषण घटना घडली. येथे ऋषभ दास नावाच्या व्यक्तीनं त्याच्या पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केली. त्यानं कुऱ्हाडीनं वार करून दोघींची हत्या केली आहे.

काय घडलं : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ दास याचं आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील गांधीनगर भागात स्टेशनरीचं दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ऋषभच्या घरातून आरडाओरडा ऐकू आल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याच्या घरी धाव घेतली. तेव्हा त्यांना ऋषभची पत्नी बिनिता दास आणि मुलगी हिया दास रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटना घडली तेव्हा हियाची एक मैत्रिण आणि तिची आई देखील ऋषभच्या घरी हजर होती.

पत्नी, मुलीवर कुऱ्हाडीनं वार केले : सर्वप्रथम आरोपीनं पत्नीवर धारदार कुऱ्हाडीनं वार केले. मुलगी हियानं ही घटना पाहिल्यावर धावत जाऊन आईला मिठी मारली. तेव्हा ऋषभनं त्याच्या मुलीवरही वार केले. त्यानं पत्नी आणि मुलगी या दोघींचाही कुऱ्हाडीनं वार करून खून केला. त्यानंतर ऋषभनं हियाची मैत्रीण आणि तिच्या आईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवानं ते एका खोलीत लपून आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर हियाच्या मैत्रिणीच्या आईनं पोलिसांना फोन केला.

हत्येचं कारण काय : हत्येची माहिती मिळताच बारपेटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी ऋषभ दास याला अटक केली. त्यानंतर बारपेटाचे एसपी अमिताभ सिन्हाही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ऋषभच्या एका शेजाऱ्यानं मीडियाला सांगितलं की, ऋषभ आणि त्याच्या पत्नीचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून चांगले नव्हते. ते एकाच घरात राहत असले तरी स्वतंत्रपणे स्वयंपाक करायचे. पत्नी बिनिता बारपेटा येथील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करत होती. ८ वर्षांपूर्वी ऋषभनं आपल्या बहिणीवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करून तिची बोटं कापली होती.

हेही वाचा :

  1. Nagpur Crime News : अनैतिक संबंधाच्या संशयातून होमगार्डची हत्या, आरोपीला अटक
  2. Bareilly Crime News : कुठुन येते इतकी क्रुरता? विनयभंगाला विरोध केल्यानं ट्रेनसमोर फेकले; विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक
  3. Thane Crime: चार्जरच्या वायरने झोपलेल्या मित्राचा गळा आवळून खून, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.