ETV Bharat / bharat

Hit And Drag In Delhi : दिल्लीत पुन्हा एकदा चालत्या कारवर तरुणाला नेले फरफटत, चालकाने केला अजब दावा - कारच्या बोनेटवर फरफटत

दिल्लीत पुन्हा एकदा हिट अँड ड्रॅग प्रकरण उघड झाले आहे. दिल्लीतील आश्रम चौकातून निजामुद्दीन दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार उघड झाला आहे. मात्र आरोपीने पीडित तरुणावरच बोनेटवर बसल्याचा आरोप केला आहे.

Hit And Drag In Delhi
दिल्लीत पुन्हा एकदा हिट अँड ड्रॅग प्रकरण
author img

By

Published : May 1, 2023, 10:52 AM IST

दिल्लीत पुन्हा एकदा हिट अँड ड्रॅग प्रकरण

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा हिट अँड ड्रॅगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील आश्रम चौकातून निजामुद्दीन दर्ग्याकडे जाणाऱ्या कारने तब्बल दोन किमीपर्यंत तरुणाला बोनेटवर फरफटत नेले आहे. ही घटना रविवारी रात्री 11 वाजता घडली. दुसऱ्या कारच्या मागील खिडकीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. ती कार थांबेपर्यंत पोलिसांनी काही अंतर गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर पोलिसांनी चालक आणि बोनेटवर बसलेल्या तरुणाची चौकशी केली. चेतन असे कारच्या बोनेटवर फरफटत नेलेल्या तरुणाचे नाव आहे.

मद्यधुंद चालकाने फरफटत नेल्याचा दावा : या घटनेतील पीडित चेतन हा व्यवसायाने चालक आहे. तो एका प्रवाशाला खाली उतरवून परत येत होता. आश्रम चौकात असताना दुसऱ्या कारने त्याच्या कारला तीनदा धडक दिल्याचा दावा चेतनने केला आहे. त्यामुळे बेशिस्त चालकामुळे संतप्त होऊन तो आपल्या कारमधून बाहेर पडून दुसऱ्या वाहनासमोर उभा राहिला. मात्र, मद्यधुंद असलेला चालक थांबला नाही, असे पीडित चेतनने वृत्तसंस्थेला सांगितले. त्यानंतर मद्यधुंद चालकाने चेतनला त्याच्या बोनेटला लटकवून पुढे फरफटत नेले.

नियंत्रण कक्षातील पोलीस धावले मदतीला : चेतनला आपल्या कारच्या बोनेटवर फरफटत नेत असताना पीडित चालकाला वारंवार गाडी थांबवण्याबाबत सांगत होता. मात्र अनेकवेळा थांबण्यास सांगूनही चालकाने आश्रम चौक ते निजामुद्दीन दर्गा असा दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास केला. मी त्याला थांबायला सांगत होतो, पण त्याने कार थांबली नसल्याचेही चेतनने यावेळी सांगितले. वाटेत पोलीस नियंत्रण कक्षातील पोलिसांनी काही अंतरापर्यंत कारचा पाठलाग केला. मात्र चालक थांबवत नसल्याने पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला थांबवण्यास भाग पाडल्याची माहितीही चेतनने वृत्तसंस्थेला दिली.

पीडित तरुणाने बोनेटवर उडी मारल्याचा दावा : दिल्लीत पुन्हा हिट अँड ड्रॅगची घटना घडल्याने प्रशासन खळबळून जागे झाले. मात्र दुसरीकडे या घटनेतील चालकाने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. रामचंद्र असे या आरोपी चालकाचे नाव असून त्याने आपली कार चेतनच्या कारच्या संपर्कात आली नसल्याचा दावा केला आहे. माझ्या कारने चेतनच्या कारला स्पर्शही केला नसल्याचा दावा आरोपी चालकाने केला आहे. चेतनने माझ्या कारच्या बोनेटवर उडी मारल्याचा दावाही या चालकाने केला. मी चेतनला काडीच्या बोनेटवरुन खाली उतरण्यासाठी विनवणीही केल्याचा दावा आरोपी चालकाने केला आहे.

हेही वाचा - Grill Lock On Grave : पाकिस्तानमध्ये बलात्कार रोखण्यासाठी कबरीवर लोखंडी जाळीचे कुलूप लावल्याचा दावा; फॅक्ट चेकमध्ये हे सत्य झाले उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.