नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दौऱ्याच्या चौथ्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्या आज (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि गीतकार जावेद अख्तर, त्यांची पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांचीदेखील भेट गेणार आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दौरा केला. नितीन गडकरींच्या भेटीत पश्चिम बंगालमधील विविध रस्ते प्रकल्पांचा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी आढावा घेतला आहे.
हेही वाचा-अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही - दिगंबर कामत
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीत त्यांनी भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकजूट करणार असल्याचे संकेत दिले. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे.
हेही वाचा-धनबाद येथील न्यायाधीशाची हत्या की अपघात.. CCTV फुटेज आले समोर
गांधींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
भाजप सध्या मजबूत स्थितीत आहे, मात्र विरोधक त्यापेक्षाही मजबूत असतील. 2024 मध्ये इतिहास रचला जाईल अशी आम्हाला आशा आहे. राजकारणात गोष्टी बदलत असतात. जेव्हा राजकीय वादळ येतं आणि स्थिती हाताळणे कठिण होते तेव्हा मोठे बदल होतात. जे केंद्र सरकारला विरोध करतात, त्यांच्याकडेच काळा पैसा आहे का असा सवालही ममतांनी यावेळी विचारला.