ETV Bharat / bharat

Swapan Majumder : भाजप आमदाराची ममता बॅनर्जींना तुरुंगात टाकण्याची धमकी

पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार स्वपन मजुमदार (Swapan Majumder) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (Swapan Majumder on Mamata Banerjee). मजुमदार यांनी आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जेल मध्ये टाकण्याची धमकी दिली आहे. (Mamata Banerjee to kicked inside jail).

Swapan Majumder
Swapan Majumder
author img

By

Published : Dec 21, 2022, 9:02 PM IST

गायघाटा (प. बंगाल) : बनगाव दक्षिणचे भाजप आमदार स्वपन मजुमदार (Swapan Majumder) यांनी ममता बॅनर्जींना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. (Mamata Banerjee to kicked inside jail). तसेच मजुमदार यांनी कार्यकर्त्यांना घाबरून न जाता तृणमुलच्या नेत्याने धमकावले तर लाठीने मारहाण करण्याचेही आवाहन केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षाच्या आमदाराच्या या टिप्पणीने राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. (Swapan Majumder on Mamata Banerjee).

बीडीओला टीएमसीचा गुलाम म्हटले : प्रधानमंत्री आवास योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात बनगाव संघटनात्मक जिल्हा भाजपच्या वतीने बुधवारी गायघाटा बीडीओ कार्यालयात प्रतिनियुक्तीचा मोर्चा काढण्यात आला. या प्रतिनियुक्ती कार्यक्रमाला बनगाव दक्षिणचे आमदार, भाजपचे बनगाव जिल्हाध्यक्ष रामपद दास, सरचिटणीस प्रबीर रॉय यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते. मंचावरून बोलताना मजुमदार यांनी सर्वप्रथम गायघाटा बीडीओवर टीएमसीचा गुलाम म्हणून हल्ला केला. तृणमूलचा कोणी नेता तुम्हाला धमकावायला आला तर लाठ्याने मारहाण करा, असे स्वपन मजुमदार म्हणाले.

आधीही अशाप्रकारच्या कमेंट : त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जीं विरोधात शाब्दिक हल्ले चालू केले. "ममता बॅनर्जी कंबरेला दोरी बांधणार म्हणायची. ती दोरी आता त्यांच्या पुतणीच्या आणि ममता बॅनर्जीच्या कमरेला बांधली जाईल. पूर्वी त्या कोणाच्या तरी कमरेला दोरी बांधू म्हणायची, आता ती तिला वाचवण्यासाठी त्या व्यक्तीचे पाय धरले आहेत," असे मजुमदार म्हणाले. गेल्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या कमरेला दोरी बांधणार असल्याचे म्हटले होते. या आधी देखील बाणगाव दक्षिणचे आमदार अशाप्रकारच्या कमेंट करून वादात सापडले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.