ETV Bharat / bharat

नंदीग्राममध्ये धुराळा... ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत, जनतेचा कौल कुणाला?

तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाचा हात धरलेले सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालमधील नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. नंदीग्राम हा सुवेंदू यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या एका दशकापासून नंदीग्राम मतदारसंघ टीएमसीकडे आहे. मात्र, सुवेंदू यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हा गडही भाजपकडे जाणार की काय? असा सवाल केला जात होता. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी
ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी
author img

By

Published : Mar 7, 2021, 8:21 AM IST

कोलकाता - भाजपाचे सरचिटणीस अरुणसिंग यांनी दोन टप्प्यांत 57 उमेदवारांची नावे जाहीर केली. तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाचा हात धरलेले सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालमधील नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी 291 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्य निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना बॅनर्जी यांनी स्व:ता नंदीग्राममधूनही निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे नंदीग्राम मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहयला मिळणार आहे.

बॅनर्जी यांनी जानेवारीत नंदीग्राम सीटवरुन निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. भवानीपूरमधून दीदी गेल्या 11 वर्षांपासून सलग लढत आल्या आहेत. मात्र, यंदा त्यांनी आपला मतदारसंघ बदलला आहे. बॅनर्जी प्रथमच नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या जागेचे प्रतिनिधित्व सुवेंदू अधिकारी यांनी 2016 मध्ये केले होते. सुवेंदू यांनी ममतांचे आव्हान स्वीकारले आहे. 50 हजार मतांनी दीदींचा पराभव करू नाहीतर राजकारण सोडून देऊ, असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.

ममतांचे कडवे आव्हान -

नंदीग्राम हा सुवेंदू यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या एका दशकापासून नंदीग्राम मतदारसंघ टीएमसीकडे आहे. मात्र, सुवेंदू यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हा गडही भाजपकडे जाणार की काय? असा सवाल केला जात होता. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री पदासाठी दावेदार -

राजकीय विश्लेषकांनुसार सुवेंदू यांनी दीदींना पराभूत केले. तर बंगालमध्ये सुवेंदू आपोआपच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात मोठा दावेदार होतात. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे मुख्य निवडणूक रणनीतिकार अमित शाह यांनीही यापूर्वीच बंगालचा पुढचा मुख्यमंत्री हा बंगालचा भूमिपुत्र असेल, अशी घोषणा केली होती. मात्र, जर सुवेंदू हे ममता यांच्याकडून पराभूत झाल्यास आणि भाजपा बहुमत मिळवू शकली नाही. तर सुवेंदूच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. अशा परिस्थितीत स्वत: ला सिद्ध करण्याची सुवेंदू यांची ही अग्नी परिक्षा आहे.

सुवेंदू यांची अग्नी परिक्षा -

नंदीग्राममध्ये सुवेंदू यांची पकड आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी माकपचे अब्दुल कबीर शेख यांना 81,230 मतांनी पराभूत केले होते. परंतु सुवेंदू यांनी आतापर्यंत नंदीग्राममध्ये तृणमूलच्या बॅनरखाली सत्ता केली. आता जेव्हा ते तृणमूलच्या विरोधात लढत आहेत. तर त्यांच्यासाठी विजय मिळवणे फार कठीण आहे. आता भाजपाच्यावतीने ते ममता बॅनर्जी यांना किती यशस्वीरित्या तोंड देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल. तर 2 मेला निकाल जाहीर होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.