पाटणा INDIA Alliance Convenor : विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीनं शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. ते यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी आघाडीचं नेतृत्व करतील. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
-
#WATCH तमिलनाडु के मुख्यमंत्री और डीएमके नेता एमके स्टालिन और पार्टी नेता कनिमोझी करुणानिधि वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए INDIA ब्लॉक नेताओं की बैठक में शामिल हुए।
— ANI_HindiNews (@AHindinews) January 13, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सीट बंटवारे, भारत जोड़ो न्याय यात्रा में भागीदारी और अन्य मुद्दों की समीक्षा के लिए बैठक चल रही है। pic.twitter.com/VXWuQKFTtA
">#WATCH तमिलनाडु के मुख्यमंत्री और डीएमके नेता एमके स्टालिन और पार्टी नेता कनिमोझी करुणानिधि वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए INDIA ब्लॉक नेताओं की बैठक में शामिल हुए।
— ANI_HindiNews (@AHindinews) January 13, 2024
सीट बंटवारे, भारत जोड़ो न्याय यात्रा में भागीदारी और अन्य मुद्दों की समीक्षा के लिए बैठक चल रही है। pic.twitter.com/VXWuQKFTtA#WATCH तमिलनाडु के मुख्यमंत्री और डीएमके नेता एमके स्टालिन और पार्टी नेता कनिमोझी करुणानिधि वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए INDIA ब्लॉक नेताओं की बैठक में शामिल हुए।
— ANI_HindiNews (@AHindinews) January 13, 2024
सीट बंटवारे, भारत जोड़ो न्याय यात्रा में भागीदारी और अन्य मुद्दों की समीक्षा के लिए बैठक चल रही है। pic.twitter.com/VXWuQKFTtA
नितीश कुमार यांचा नकार : आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी याला नकार दिला. इंडिया आघाडीच्या आभासी बैठकीत काँग्रेसनं त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र नितीश कुमार यांनी समन्वयक पद काँग्रेसकडेच असावं, असं सांगितलं. या बैठकीला आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, एमके स्टॅलिन, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल आणि डीके राजा यांच्यासह 14 पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे या आभासी बैठकीत सहभागी झाले नाहीत.
अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जागावाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही. नितीश कुमार यांना समन्वयक करण्याचा प्रस्ताव इंडिया आघाडीत होता. मात्र त्यांनी याला नकार दिला. त्यांनी अद्याप कोणतीही संमती दिलेली नाही. काँग्रेसनं नेतृत्व करावं, असं ते म्हणाले. आता सर्व मुद्द्यांवर पक्षांतर्गत चर्चा होईल. - संजय झा, जेडीयू नेते आणि मंत्री, बिहार सरकार.
जागावाटपावर चर्चा : इंडिया आघाडीच्या व्हर्च्युअल बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीच्या अजेंड्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र काँग्रेस जागावाटपाबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सातत्यानं चर्चा करत आहे. बिहारच्या बाबतीत जेडीयूनं काँग्रेसशी कोणतीही चर्चा केलेली नाही. जेडीयू स्पष्टपणे सांगतं की त्यांची युती आरजेडी सोबत आहे. त्यामुळे आरजेडीचे नेते कॉंग्रेसशी चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घेतील. त्यानंतर जेडीयू आरजेडीसोबत चर्चा करणार आहे.
इंडिया आघाडीच्या बैठका : इंडिया आघाडीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या. 23 जून 2023 रोजी पाटणा येथे पहिली बैठक झाली. त्यानंतर बेंगळुरू, नंतर मुंबई आणि डिसेंबरमध्ये दिल्लीत बैठका झाल्या. आता ही आभासी बैठक 13 जानेवारीला झाली.
हे वाचलंत का :