बिजिंग Maldives President Muizzu: मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीनंतर मालदीवची पर्यटन कोंडी करण्याचे सूर भारतातून उमटू लागले आहेत. मालदीवमध्ये भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात जात असतात. परंतु, भारतीय पर्यटक (Indian Tourists) आणि पर्यटन कंपन्यांनी आता या प्रकरणानंतर बुकिंग रद्द केली आहे. त्यामुळं मालदीवच्या पर्यटन विभागाला मोठा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
मोहम्मद मुइज्जू यांनी चीनकडं केली मागणी : या सर्व प्रकरणानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनकडं (China) मोर्चा वळवला आहे. मालदीवमध्ये पर्यटक पाठवण्याची मागणी मोहम्मद मुइज्जू यांनी चीनकडं केली आहे. पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीनंतर भारतातील नागरिकांनी मालदीव सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. तसंच सोशल मीडियावर मालदीव पर्यटनाबाबतनिषेध करण्यासाठी हॅशटॅग मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत देशातील राजकारणी, सेलिब्रिटी, क्रिकेटर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.
चीन हा मालदीवचा सर्वांत जवळचा मित्र आहे : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे चीन दौऱ्यावर आहेत. चीनच्या फुजियान प्रांतातील मालदीव बिझनेस फोरममध्ये मोइज्जू बोलत होते. चीन हा मालदीवचा सर्वांत जवळचा मित्र आहे. चीन हा आपला सर्वात जवळचा मित्र आणि विकास भागीदार आहे. चीन आमची (मालदीवची) प्रथम क्रमांकाची बाजारपेठ होती. चीनला हे स्थान परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे, असं राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू म्हणाले.
हेही वाचा -
- पंतप्रधान मोदींबाबत आपत्तीजनक वक्तव्य, भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये; मालदीवच्या राजदूतांना बोलावलं
- सोशल मीडियावर #Boycott Maldives ट्रेंड का होतंय? मोदींच्या लक्षद्वीप पोस्टचा काय संबंध?
- Maldives Elections : मालदीवमध्ये चीन समर्थक मुइज्जू बनू शकतात नवे राष्ट्रपती, भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल?