पाटणा - बिहारमधील परीक्षांचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्डाची परीक्षेच्या (बीएसईबी) गुणपत्रिकेवर मल्याळम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचा फोटो झळकला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही गुणपत्रिका मुळात एसटीईटीच्या परीक्षेचा विद्यार्थी ऋषीकेश कुमार याची आहे.
बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी एसटीईटी परीक्षेच्या निकालावरून बिहार सरकारवर टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते रितू जैस्वाल यांचे ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले, की बिहारच्या ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेच्या गुणपत्रिकेवर अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापून आला होता. आता मल्याळम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनदेखील एसटीईटी पास झाली आहे. नितीश (बिहारचे मुख्यमंत्री) हे प्रत्येक परीक्षेच्यावेळी कोट्यवधी तरुणांचे भविष्य खराब करत असल्याचे जैस्वाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
सनी लियोनी को बिहार की जूनियर इंजीनियर परीक्षा में टॉप कराने के बाद अब मलयालम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन को #STET परीक्षा पास करवा दी है।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) June 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नीतीश जी हर परीक्षा-बहाली में धाँधली करा करोड़ों युवाओं का जीवन बर्बाद कर रहे है। एक बहाली पूरा करने में एक दशक लगाते है वह भी धाँधली के साथ। https://t.co/1QJQ8ulqQ2
">सनी लियोनी को बिहार की जूनियर इंजीनियर परीक्षा में टॉप कराने के बाद अब मलयालम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन को #STET परीक्षा पास करवा दी है।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) June 24, 2021
नीतीश जी हर परीक्षा-बहाली में धाँधली करा करोड़ों युवाओं का जीवन बर्बाद कर रहे है। एक बहाली पूरा करने में एक दशक लगाते है वह भी धाँधली के साथ। https://t.co/1QJQ8ulqQ2सनी लियोनी को बिहार की जूनियर इंजीनियर परीक्षा में टॉप कराने के बाद अब मलयालम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन को #STET परीक्षा पास करवा दी है।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) June 24, 2021
नीतीश जी हर परीक्षा-बहाली में धाँधली करा करोड़ों युवाओं का जीवन बर्बाद कर रहे है। एक बहाली पूरा करने में एक दशक लगाते है वह भी धाँधली के साथ। https://t.co/1QJQ8ulqQ2
हेही वाचा-कोरोनाच्या लाटेत दिल्ली सरकारकडून गरजेपेक्षा चारपटीने ऑक्सिजनची मागणी - अहवाल
व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
आरजेडीचे नेते रितू जैस्वाल यांनी हा व्हिडिओ समाज माध्यमात शेअर केला आहे. त्यांनी ट्विट केले, तरुणांच्या भविष्यांबरोबरदेखील घोटाळा. अशा सरकारने जीव द्यावा. देशभरातून लोक प्राचीन विद्यापीठ असलेल्या नालंदा विद्यापीठात शिकण्यासाठी येत होते. आता, मल्याळम अभिनेत्रीने बिहारमध्ये नोकरीसाठी नोंदणी केली आहे.
हेही वाचा-भाजपासारख्या पक्षाने सुडाचे राजकारण करणं दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे
ईटीव्ही भारतने पडताळणी केली असताना ऋषीकेश कुमारच्या अकाउंटवर त्याच्या फोटोऐवजी अभिनेत्रीचा फोटो दिसत आहे. त्याबाबत अद्याप बोर्डाने प्रतिक्रिया दिलेली नाही.