ETV Bharat / bharat

Makar Sankranti 2022 : मकर संक्रांत सण : इतिहास, महत्त्व, पुण्यकाल, स्नान आणि दानाचे महत्त्व, सांगताहेत पंचांगकर्ते मोहन दाते - मकर संक्रांतीला दानाचे महत्त्व

आज मकर संक्रांतीचा ( Makar Sankranti 2022 ) सण. त्यानिमित्त प्रसिद्ध दाते पंचांगाचे मोहन दाते यांनी खास ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे. मकर संक्रांतीचा इतिहास ( History Of Makar Sankranti ) , महत्त्व ( Importance Of Makar Sankranti ) , पुण्यकाल ( Makar Sankranti Punyakal ) , स्नान आणि दानाचे ( Importance Of Charity In Makar Sankranti ) महत्त्व याची माहिती सांगताहेत पंचांगकर्ते मोहन दाते.

मकर संक्रांत सण : इतिहास, महत्त्व, पुण्यकाल, स्नान आणि दानाचे महत्त्व, सांगताहेत पंचांगकर्ते मोहन दाते

author img

By

Published : Jan 14, 2022, 12:51 AM IST

सोलापूर- नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत ( Makar Sankranti 2022 ) होय. दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आहे. हिंदू पंचागाप्रमाणे पौष महिन्यात येणार महत्वाचा सण आहे. या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण येतो. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. म्हणून या सणाला मकर संक्रांत म्हणतात. या दिवशी तिला द्वारे केलेल्या वस्तूंचे दान केले जाते. मकर संक्रांतीला सुर्यदेवाची पूजा केल्यानंतर केलेलं दान हे फलदायी ठरते.

मकर संक्रांत सण : इतिहास, महत्त्व, पुण्यकाल, स्नान आणि दानाचे महत्त्व, सांगताहेत पंचांगकर्ते मोहन दाते

मकर संक्रांत सण

मकर संक्रांत हा सण इंग्रजी कालगणनेनुसार 14 जानेवारीला व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. तसे पाहिले तर संक्रात दर महिन्यात असते. राशी बारा आहेत, सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात. पण मकर आणि कर्क राशीचे संक्रमण महत्वाचे आहे. सूर्य कर्क राशीतून मकर राशीत जातो तेव्हा उत्तरायण सुरू होते. हा दिवस म्हणजे मकर संक्रांत होय.

मकर संक्रांतीचा पौराणिक इतिहास

( Makar Sankranti Story ) मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो. याबद्दल इतिहासात काही पौराणिक माहिती प्राप्त होते. महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध सुरू होते. अर्जुन भीष्माशी लढत होता. पण अर्जुनाला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडीला पुढे उभे केले आणि त्याच्याआडं थांबून अर्जुन लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्माने आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका,आंबलीका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या. अंबेचे दुसऱ्या राजावर प्रेम होते. म्हणून भीष्माने अंबेला दुसऱ्या राजाकडे पाठविले होते. पण पळवून नेलेल्या राजकन्येचा स्वीकार करण्यास त्या राजाने नकार दिला होता. ज्या भीष्मामुळे हे सारे घडले, त्याच सूड घेण्यासाठी अंबेने ठरविले होते. त्याने कठोर तपचर्य करून शिखंडी नावाच पुरुष झाली होती. भीष्माशी लढायला आल्यावर भीष्म लढला नाही. कारण ती अगोदर स्त्री होती. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळला. त्यांचा अंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाण घुसले होते. तो जमिनीवर न पडता बाणांवरच आडवा झाला. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरणायनचा शुभ काल सुरू होण्याची वाट पहिली आणि मगच प्राण सोडले ( History Of Makar Sankranti ).

मकर संक्रांतीबाबत पुराणात दिलेली माहिती

पुराणात मकर संक्रांतीची अशी कथा सांगितली जाते की, संकरासुर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रातीदेवी असे म्हटले जाऊ लागले. ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाते असे म्हणतात.ही माहिती पंचांगात दिलेली आहे.यंदाच्या वर्षी या देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातात गधा घेतली आहे. वासाकरिता हातात जाईचे फुल आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. भूषणांर्थ मोती धारण केले आहे. उत्तरे कडून दक्षिणेकडे जात आहे. नैऋत्य दिशेस पाहत आहे. संक्रातीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष व गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे ही कामे करू नयेत असे पंचागमध्ये सांगितले आहे ( Importance Of Makar Sankranti ).

मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचे महत्व

मकर संक्रांतीला स्नान आणि दान याला विशेष महत्व ( Importance Of Charity In Makar Sankranti ) आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे खूप शुभ मानले जाते. तसेच यादिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी खिचडी दान करणे पुण्यकारक मानले जाते.

मकर संक्रांतीला ऋतूत बदल

मकर संक्रांत हा सण देशभरात विविध नावांनी साजरा केला जातो. मकर संक्रांतीला सूर्यदेव उत्तरायण करतात. मान्यतेनुसार ऋतूतील बदल या दिवसापासून सुरू होतो. मकर संक्रांतीपासून हिवाळा कमी होऊ लागतो. म्हणजे शरद ऋतुच्या प्रस्थानाची वेळ सुरू होते आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते.

मकर संक्रांतीचा पुण्यकाळ

14 जानेवारी 2022 , शुक्रवार दुपारी 2.29 पासून सुर्यास्तपर्यंत आहे.

मकर संक्रांत दिवसाचे कर्तव्य

तिला मिश्रित उदकाने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलाहोम, तीलतर्पण, तीलभक्षण व तीलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.