ETV Bharat / bharat

LIVE UDATE : महाशिवरात्रीच्या पर्वावर देशभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर - महाशिवरात्री बातम्या

mahashivratri live update
LIVE UDATE : महाशिवरात्रीच्या पर्वावर देशभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Mar 11, 2021, 6:38 AM IST

Updated : Mar 11, 2021, 12:05 PM IST

11:57 March 11

परळी येथील वैजनाथाचे मंदिर बंद; मात्र पायरीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी

live
पायरीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी

परळी - महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी परळी येथे वैजनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भक्त गर्दी करत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी वैजनाथ मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व शिवालय बंद आहेत. असे असले तरी वैजनाथाचे दर्शनासाठी नागरिक येत आहेत. मंदिर बंद असले तरी पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वैजनाथाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. 

11:54 March 11

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात 51 किलो चक्क्याची शंकराची पिंड

पुणे - श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात 51 किलो चक्क्याची शंकराची पिंड,जटाधारी मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून चक्क्याची शंकराची पिंड साकारण्यात आली. माधव जोशी यांनी साकारलेला शंकराचा जटाधारी मुखवटा यंदाच्यावर्षी देखील विशेष आकर्षक ठरला.

10:25 March 11

जम्मू-काश्मिरच्या शंकराचार्य मंदिरात होम-हवन

LIVE
शंकराचार्य मंदिरात होम-हवन

जम्मू-काश्मिर : भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त श्रीनगरच्या शंकराचार्य मंदिरात पुजा आणि होम-हवन केले. 

08:38 March 11

महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

live
राष्ट्रपतींचे ट्विट

नवी दिल्ली - महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. 

08:37 March 11

महाशिवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

live
नरेंद्र मोदींचे ट्विट

नवी दिल्ली - महाशिवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. 

07:30 March 11

महाशिवरात्रीनिमित्त उजैनच्या महाकाल मंदिरात दुग्धाभिषेक

live
उज्जैन

उज्जैन (मध्यप्रदेश) - गुरूवारी महाशिवरात्रीनिमित्त महाकाल मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला. 

07:28 March 11

वाराणसी : काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा

वारणसी

वाराणसी: काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर शेकडो भाविकांनी आज सकाळी रांगा लावल्या होत्या. 

07:24 March 11

महाशिवरात्रीनिमित्त हरिद्वारमध्ये भाविकांची मोठी गर्दी

live
हरिव्दार

उत्तराखंड - महाशिवरात्रीनिमित्त हरिद्वारमध्ये गंगा नदीत भाविकांना डुबकी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

06:49 March 11

औंढा नागनाथ मंदिरात साधेपणाने साजरी होणार महाशिवरात्री

हिंगोली -  आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते. मात्र, यंदा कोरोना महाशिवरात्री साधेपणाने साजरी होणार आहे.  केवळ पुजा-अर्चा, अन महाआरती करून एवढ्यावरच हा उत्सव पार पडणार आहे. 

06:48 March 11

कोरोनामुळे १२ वे ज्योर्तीलिंग असलेले घृष्णेश्वर शिवमंदिर तीन दिवस बंद

औरंगाबाद -  महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथील १२ वे ज्योर्तीलिंग असलेल्या घृष्णेश्वर शिवमंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो. महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. हर हर महादेवचा गजर परिसरात घुमतो. मात्र, कोरोनाचे सावट पाहता मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा हिरमोड झाला आहे. 

06:45 March 11

सोलापूर शहरातील प्रमुख चार मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

सोलापूर - महाशिवरात्री निमित्ताने सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सोलापूर शहरातील प्रमुख चार मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. फक्त मंदिर समितीत असलेल्या सदस्यांना पूजा अर्चना करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर शहरातील इतर शिवमंदिरात गर्दी होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश बुधवारी रात्री पालिका आयुक्तांनी दिले आहे. सिद्धेश्वर मंदिर, रेवणसिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जून मंदिर आणि होटगी महाराज मठ या मंदिरात फक्त पुजारी आणि व्यवस्थापकांनाच परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची महाशिवरात्री साधेपणाने साजरी करावी, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 

06:00 March 11

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद

mahashivratri live update
त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

नाशिक - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराला महाशिवरात्री निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, कोरोनामुळे यंदाची महाशिवरात्री भविकाविनाच साजरी होणार आहे.  नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले आहे. तसेच 10 ते 14 मार्च पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला महादेव मंदिरात येत असतात. 

Last Updated : Mar 11, 2021, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.