ETV Bharat / bharat

Breaking News Live : अजितदादा मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ' दिल्लीला जा, आता राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ' - National Updates

Breaking News Live
Breaking News Live
author img

By

Published : Sep 14, 2022, 8:00 AM IST

Updated : Sep 14, 2022, 10:38 PM IST

22:38 September 14

अजितदादा मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ' दिल्लीला जा, आता राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ'

वैजापूर(औरंगाबाद)- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पातून राज्यात मोठी गुंतवणूक होण्याबरोबरच महाराष्ट्राला प्रचंड वस्तू व सेवा कर (GST) मिळणार होता. सध्याच्या काळात अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. अशावेळी तब्बल दोन लाख रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची विनंती केल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. आम्ही सगळी परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी वेळ पडल्यास दिल्लीत जा. इथे राजकीय इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे आहे. तुम्ही काहीही करा, यासंदर्भात वेदांता समूहाशी बोलून त्यांच्याकडे महाराष्ट्रात परत येण्यासाठी आग्रह धरा, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते आज बुधवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

21:20 September 14

सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगरच्या नौगाम भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत एकूण दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी म्हटले आहे.

17:45 September 14

देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील साधू हल्ल्याप्रकरणी दिले चौकशीचे आदेश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजीपीशी रशियाहून फोनवर बोलून सांगलीच्या घटनेची सविस्तर चौकशी करण्यास सांगितले.

16:44 September 14

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांचे म्हाडाविरोधात आंदोलन सुरू

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील गृहखरेदीदारांनी अपार्टमेंटचा ताबा देण्यास उशीर केल्याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे.

16:13 September 14

17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदावर स्वाक्षरी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाने 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान अंडर-17 महिला विश्वचषक आयोजित केला जाईल, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

15:35 September 14

विमानाच्या इंजिनमध्ये धूर आढळल्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढले सुखरूप

विमानाच्या इंजिनमध्ये धूर आढळून आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. रिलीफ फ्लाइटची व्यवस्था केली जाईल. आम्ही घटनेची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू, असे डीजीसीएने म्हटले आहे.

13:30 September 14

आमदार सदा सरवणकर यांचे पोस्टर फाडणाऱ्या दोन तरुणांना अटक

मुंबई : शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडून दोघांना अटक सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांचे बॅनर फाडल्याप्रकरणी पोलिसांनी करवाई केली आहे. विशाल कानडे आणि विजयकुमार यादव अशी अटक केलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. दादर परिसरात आमदार सदा सरवणकर यांचे पोस्टर फाडणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे.

13:04 September 14

आमदार बच्चू कडूंचा जामीन फेटाळला.. न्यायालयीन कोठडीत रवानगी

आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ गिरगाव कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

विरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यानंतर गिरगाव कोर्टाकडून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

आमदार बच्चू कडू यांचा गिरगाव कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे

आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बच्चू कडून विरोधात कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट चारी

12:12 September 14

महाराष्ट्राचं सरकार मोदी आणि शाहचे हस्तक.. फडणवीस आता कुठे तोंड दाखवणार : नाना पटोले

नाना पटोले -

महाराष्ट्राचं सरकार मोदी आणि शाह चे हस्तक आहे. त्यांनी जनतेच हस्तक असायला पाहिजे..

केंद्र सरकार सांगितले तस् वागतात. गुजरातच्या नेत्यांचे आशीर्वाद राहिले पाहिजे ही भूमिका असल्याने महाराष्ट्र विकून देत आहे .

उद्या मुंबई गुजरात मध्ये गेली तरी आश्चर्य वाटणार नाही..

लाखो लोकांना रोजगार आणि २६ हजार कोटी रुपये रेव्हेन्यू सरकारला प्राप्त होणार होते.

स्वतः ला हिंदू सम्राट मानणाऱ्या गृहमंत्र्यांच्या काळात साधुवर हल्ले होत असतील तर आता कुठे तोंड दाखवतील.

राहुल गांधी यांच्या पदयात्रा सुरू झाल्या पासून भाजप मध्ये बेचैनी सुरू झाली. मोदींचं सिंहासन डोलत आहे..

असाच प्रयत्न झारखंड मध्ये केला पण यशस्वी झाला नाही, बिहार मध्ये पण नितीन कुमार ने जागा दाखविली..

भाजप लोकशाहीला विकत घेऊ इच्छितो. भ्रष्टाचाराच्या माध्यमांतून पैसा गोळा करून केंद्राच्या संस्थेला हाताशी धरत आहे..

भाजप ची ही घाणेरडी परंपरा आहे

भाजप ला लोकशाही सोबत संबंध नाही..

केंद्राने कोरोणा काळात ज्या उपाय योजना करायला पाहिजे त्या केल्या नाही, स्वताच्या मस्ती साठी सरकार चालवत..

१० लाखांच्या सुटबुटाच सरकार महाराष्ट्रात आहे..

मुख्यमंत्री पंतप्रधान सोबत बोलले तर आता ते त्यांना मान देतात का हे पाहावं लागेल..

शंकराचार्य, रामदास स्वामी, सारख्या तीन लोकांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली राहुल गांधी हे चौथे आहेत..

धर्म कोणाला द्वेष करायला शिकवत नाही, त्यामुळे भाजप ने राहुल गांधी ला सर्टिफिकेट देऊ नये..

11:27 September 14

सांगलीत साधूंना मारहाण प्रकरण : पोलिसांत गुन्हा दाखल, ६ जण अटकेत

सांगली : जत येथील लवंगा येथील साधूंना मारहाण प्रकरणी - उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - 6 जणांना करण्यात आली अटक - जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांची माहिती.

गैरसमजूती मधून घडला प्रकार -कर्नाटकहुन पंढरपूरकडे हे साधू देवदर्शनासाठी जत तालुक्यातील लवंगा मार्गे निघाले होते. साधू तक्रार द्यायच्या मानसिकतेत नव्हते. पण या घटनेप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली आहे. 6 जणांना अटक करण्यात आलं आहे. आणखी काही संशयितांचा शोध सुरू. पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांची माहिती.

11:06 September 14

गोव्यात काँग्रेसचे 'हे' आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

मायकल लोबो

दिगंबर कामत

दिलायला लोबो

राजेश फळदेसाई

रुदलफ फर्नांडिस

अलेक्स सीकवेरा

केदार नाईक

संकल्प आमोणकर

06:53 September 14

Breaking News Live : अजितदादा मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ' दिल्लीला जा, आता राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ'

केरळ : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाच्या #भारत जोडो यात्रेच्या आठव्या दिवसाची सुरुवात तिरुअनंतपुरमच्या नवयक्कुलम येथून केली.

Last Updated : Sep 14, 2022, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.