नवी दिल्ली - देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचे हे संकट स्वातंत्र्यानंतरचे भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं. तसेच त्यांनी कोरोना परिस्थती हाताळण्यावरून महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. दिल्लीमध्ये शिकागो सेंटर विद्यापीठाने आयोजित केलेल्या व्हर्चूअल कार्यक्रमात ते बोलत होते.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी भारताने दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याची त्वरित आवश्यकता आहे. देशात कोरोना पसरल्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक आव्हान उभे राहिले होते. मात्र, आता हे आव्हान आर्थिक व वैयक्तिक दोन्ही पातळीवर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारतामध्ये दररोज 3 लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. संसर्गामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे, असे राजन म्हणाले.
महाराष्ट्राचे कौतूक -
कोरोना रूग्णांना महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी पुरवू शकले. मात्र, इतर सरकारांना ऐवढे सुद्धा करता आले नाही, असे म्हणत राजन यांनी म्हष्ट्राचे कौतुक केले. महामारीनंतर समाजाकडे आपण गांभीर्याने प्रश्न विचारले नाही. तर ही महामारी इतकीच मोठी शोकांतिका ठरेल. कधीकधी आपण लपून नव्हे. तर उघडपणे सुधारणा करणे आवश्यक आहे, असेही राजन म्हणाले. सध्या रघुराम राजन शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझिनेस विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
कोरोना संकटामागे नेतृत्वाचा अभाव -
यापूर्वी रघूराम राजन यांनी कोरोना परिस्थीती हातळण्यावरून केंद्रावर टीका केली होती. देशात कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखांवर जात असून दुसरी लाट रोखण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे रघुराम राजन म्हणाले होते. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव याचा परिपाक म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाचे मोठं नुकसान केले, असे ते म्हणाले होते.
हेही वाचा - चटका लावणारी एक्झिट! वाचा खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया