हेद्राबाद: शिवसेनेचे विश्वासु नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा गाडला आणि महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी तडजोड करत शिवसेनेने धक्का दिला पण आता शिवसेनेचे पतन होताना पहायला मिळत आहे. शिवसेना नेत्यांवर झालेली ईडीची कारवाई, समन्वयाचा अभाव, हिदुत्वाची भुमीका, मुख्यमंत्र्यांचा दुरावा, सरकारमधे काम न होणे ही प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. भाजपने सरकारला अडचणीत आनण्याची एकही संधी सोडली नाही. आम्ही सरकार पाडणार नाही सरकार आपोआप पडेल असे सांगतानाच वेगवेगळ्या मुद्यांवरुन सरकारला अडचणीत आणताना नाराजांना गोंजरण्याचे काम भाजपने केले आणि गाफील शिवसेनेला खिंडार पाडले.
ई़डीच्या कारवाया: राज्यात राज्य सरकार विरुध्द केंद्रिय तपास यंत्रणा हा सामना चांगलाच रंगला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर आव्हानच स्विकारले आणि मुख्यमंत्र्यांसह अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शिवसेनेचे अनिल परब, संजय राऊत, प्रताप सरनाईक, भावना गवळी, अर्जुन खोतकर, आनंद अडसुळ, यशवंत जाधव अशा नेत्यांवर इडीच्या धाडी पडल्या आहेत. अनेकजण चोकशीच्या फेऱ्यात आहेत. तर अनेकांच्या संप्पतीवर टाच आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी तसेच मेव्हणे आणि नेत्यांच्या नातेवाईकांवरही आरोप आणि चौैकशीची टांगती तलवार आहे. चौकशीचा ससेमीरा नको म्हणुन अनेक नेते उध्दव ठाकरे यांना भाजपशी जुळवुन घेण्याची मागणी करत होते.
मुख्यमंत्र्यांचा दुरावा: उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्विकारल्या पासुन शिवसेनेत धुसफुस होती. यातच सरकार स्थापनेनंतर आलेले कोरोना संकट तसेच त्या नंतर उध्दव ठाकरे यांचे आजारपण त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या सगळ्या प्रकारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातुन बैठका समारंभ यात सहभागी होत होते. राष्ट्रवादी तसेच काॅग्रेसचे सगळे नेते प्रत्यक्ष हजर असायचे मुख्यमंत्री घरात बसुन राज्याचा कारभार पाहतात असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत गेला. पक्षातील पदाधिकारी नेते तचेच सामांन्यांचीही तीच भावणा झाली.
समन्वयाचा अभाव: मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत कारभार सुरु असताना पक्ष आणि सरकारच्या पातळीवर समन्वयाचा अभाव पहायला मिळायचा पक्ष प्रमुखच मुख्यमंत्री होते. पक्ष आणि सरकारच्या पातळीवर आवश्यक समन्वय नसायचा ही बाब हेरुन एकनाथ शिंंदे यांनी आमदार तसेच सरकार पातळीवर समन्वयाची भुमीका निभावताना सरकार आणि आमदारांच्या पातळीवर आपला एक वेगळा ठसा उमटवला. त्यातुनच त्यांची इतर नाराज नेते आणि आमदारांशी जवळीक झाली. त्यांनी अनेक आमदारांची कामे मार्गी लावायला मदत केली त्याचा त्यांना या बंडाच्या वेळी फायदा झाल्याचे सांगण्यात येते.
हिंदुत्वाची भुमिका: बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचे हिदुत्व हे कडवे हिंदुत्व होते. ते कायम त्याचा उल्लेख करायचे भाजपच्या मवाळ हिदुत्वा पुढे शिवसेनेचे हिदुत्व अधोरेखीत होत होते. उध्दव ठाकरे यांची प्रतिमा सुरवाती पासुन संयमी नेता अशी आहे. त्यातच त्यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक साधल्या नंतर शिवसेनेने हिदुत्व सोडले अशी जोरदार टिका विरोधकांनी सुरु केली. यातच मशीदीवरील भोंगे उतरवणे तसेच हनुमान चालीसा सारख्या मुद्यांना हवा देत शिवसेनेचे हिंदुत्व बाळासाहेबांचे हिदुत्व राहिले नाही असा जोरदार प्रचार केला त्या नंतर शिवसेनेने कायम आमचे हिदुत्व कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फायदा झाला नाही.
आमदारांची नाराजी: महाविकास आघाडी सरकारमधे मुख्यंत्री पद शिवसेने कडे असले तरी महत्वाची सगळी खाती राष्ट्रवादीकडे होते. सरकारच्या कारभारात राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. यात आमची कामे होत नाहीत आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते असा आरोप काॅंग्रेसकडुन होत होता. शिवसेना आमदारांची पण हीच तक्रार होती. एक तर मुख्यमंत्री भेटत नाहीत आमची कामे होत नाहीत राष्ट्रवादीच्या आमदार मंत्र्यांची कामे होतात असे उघड आरोप अलीकडच्या काळात होत होते पण त्या आरोपांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे नाराजी वाढतच गेली.
आयातांना सन्मान जुन्यांकडे दुर्लक्ष: शिवसेनेने महाविकास अघाडीच्या स्थापनेच्यावेळी आदित्य ठाकरे यांना मंत्रीमंडळात सामाऊन घेतले. त्यांच्या सोबत जुन्या आणि निष्ठावानांकडे दुर्लक्ष करत निवडणूकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या आयात उमेदवारांना सन्मान दिला गेला. मंत्रीपदाचे वाटप करताना त्यांना प्राधान्य दिल्याची खदखद जुन्या शिवसैनिक पदाधिकारी आणि नेत्यांमधेही होती. यातच आज शिंदे गटात सामिल झालेल्या अनेक आमदारांना त्यांनीच आयात करुन तिकीट देऊन मंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आज ते पक्षा पेक्षा शिंदेना मोठे मानत त्यांच्या गटात सहभागी झाल्याचे सांगितले जाते.