मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारविरुद्ध बंड करून राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणले होते. आता अजित पवार यांनी काका शरद पवारांविरोधात जाऊन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ केली आहे.
विरोधी पक्षांनी बंडाला भाजपला जबाबदार धरले : राज्यातील या घडामोडींवर आता देशभरातील नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या नेत्यांनी व मित्र पक्षांनी अजित पवारांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षांनी अजित पवारांच्या या बंडासाठी भाजपला आणि त्यांच्याद्वारे सत्तेच्या आडून करण्यात येणाऱ्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला जबाबदार धरले आहे.
-
#WATCH | "Sharad Pawar 'ek haisiyat hein aur takat hein' and PM Modi tried to shake him, but nothing will happen, everything will fail": RJD leader Lalu Yadav pic.twitter.com/AFLWzzt2JY
— ANI (@ANI) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | "Sharad Pawar 'ek haisiyat hein aur takat hein' and PM Modi tried to shake him, but nothing will happen, everything will fail": RJD leader Lalu Yadav pic.twitter.com/AFLWzzt2JY
— ANI (@ANI) July 3, 2023#WATCH | "Sharad Pawar 'ek haisiyat hein aur takat hein' and PM Modi tried to shake him, but nothing will happen, everything will fail": RJD leader Lalu Yadav pic.twitter.com/AFLWzzt2JY
— ANI (@ANI) July 3, 2023
शरद पवारांना काहीही होणार नाही - लालू : महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव म्हणाले की, 'शरद पवार हे भक्कम आणि ताकदवान नेते आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांना हादरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीही होणार नाही. त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतील'. पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्या म्हणाल्या की, 'भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत राहिले. मात्र आता त्यांनी महाराष्ट्रात त्यांनाच सरकारमध्ये घेतले आहे. यावरून भाजप हा सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचे दिसून येते'. भाजपने देशातील विरोधी पक्ष संपवण्यासाठी ईडी, सीबीआयच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
-
First attack the corrupt
— Kapil Sibal (@KapilSibal) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Then embrace the corrupt
First guarantee their investigation
Then get a warranty for their support
Investigation in suspension
Henceforth ED , CBI : No tension
Sounds familiar ?
Mother of democracy at work !
">First attack the corrupt
— Kapil Sibal (@KapilSibal) July 3, 2023
Then embrace the corrupt
First guarantee their investigation
Then get a warranty for their support
Investigation in suspension
Henceforth ED , CBI : No tension
Sounds familiar ?
Mother of democracy at work !First attack the corrupt
— Kapil Sibal (@KapilSibal) July 3, 2023
Then embrace the corrupt
First guarantee their investigation
Then get a warranty for their support
Investigation in suspension
Henceforth ED , CBI : No tension
Sounds familiar ?
Mother of democracy at work !
कपिल सिब्बल यांचा तिरपा कटाक्ष : राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी सोमवारी भाजपवर तिरपा कठोर शाब्दिक कटाक्ष केला. त्यांनी ट्विट केले की, 'आधी भ्रष्टाचाऱ्यांवर हल्ला करायचा आणि नंतर त्यांना मिठी मारायची. आधी त्यांना तपासाची भीती दाखवायची, आणि नंतर त्यांच्याकडून समर्थन घ्यायचे. लोकशाहीच्या जननीमध्ये आज हे होत आहे'.
सुशील मोदी यांची सूचक प्रतिक्रिया : बिहारमधील भाजपचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी या घटनाक्रमानंतर बोलताना अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. नितीश कुमारांच्या जेडीयूतील अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले आहेत. सुशील मोदी म्हणाले की, 'नितीशकुमारांच्या जेडीयूला काही भविष्य नाही. त्यांच्या पक्षात गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांचे नेते इतर पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत'.
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis : सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती
- Maharashtra Political Crisis : साहेबांकडे जावे की दादांकडे; आमदारांची झाली गोची, पाहा आकडेवारी
- Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रानंतर आता बिहारचा नंबर? सुशील मोदी म्हणाले, नितीशकुमारांनी नाक घासले तरी...