ETV Bharat / bharat

Todays Top News : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, पंतप्रधान गोबरधन प्लांटचे उद्धाटन करणार यासह वाचा महत्त्वाच्या टॉप न्यूज एका क्लिकवर - आजच्या बातम्या

Todays Top News : आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
author img

By

Published : Feb 19, 2022, 5:48 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आजच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सविस्तर पाहा...
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशातील इंदूर येथे “गोबरधन (बायो-CNG) प्लांट” चे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी 1 वाजता करणार आहे.
  • राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपुरात दोन दिवसीय दौऱ्यावर
  • मुंबईतील यशवंत चव्हाण केंद्रात सुरू असलेल्या महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाची सांगता. सविस्तर वाचा...

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • औरंगाबाद - 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भारतातील सर्वात उंच अशा अश्वारुढ पुतळ्याचे ( Memorial of Monument of Chhatrapati Shivaji Maharaj ) अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने सोहळ्यात सहभागी झाले. या प्रसंगी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, खा. इम्तियाज जलील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार यांच्या उपस्थित होते. सविस्तर वाचा...
  • हैदराबाद : भारतीय स्वातंत्र्य समरात अनेक महान राजकीय आणि सामाजिक नेत्यांचे अग्रगण्य स्थान आहे. त्यातच महात्मा गांधी यांचा तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. गांधीजींच्यावर प्रभाव असणारे आणि ज्यांना गांधीजी आपले राजकीय गुरू मानत असत, ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, महान राजकारणी, समाजसुधारक, वक्ते आणि अर्थशास्त्रज्ञ गोपाळ कृष्ण गोखले. यांच्याबद्दल त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज आपण जाणून घेणार आहेत. सविस्तर वाचा...
  • मुंबई : मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली ( BMC Notice to Narayan Rane ) आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले आहे का ( Narayan Rane Bungalow Illegal Construction Complaint ) याची पालिका तपासणी करणार ( BMC Investigate Narayan Rane Banglow Construction ) आहे. त्यासाठी पालिकेच्या के वेस्ट विभागाने बंगल्यात जाऊन छायाचित्र आणि मेजरमेंट घेण्यासाठी येणार असल्याचे नोटीसद्वारे कळविले होते. यापार्श्वभूमीवर पालिकेचे पथक आज राणे यांच्या बंगल्यावर गेले ( Municipal team at Rane's house ) होते. मात्र राणे यावेळी घरी नसल्याने पालिकेचे पथक माघारी परतले आहे. पालिकेचे पथक पुन्हा सोमवारी भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सविस्तर वाचा...
  • ठाणे : एखादा सर्वसामान्य नागरिक जर हॉटेलमध्ये खाऊन झाल्यावर पैसे न भरता निघून गेला तर हॉटेलचालक किती चिडतो हे आपण पाहिले असेलच. असाच काहीसा प्रकार ठाण्यात पाहायला मिळाला आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister of State for Railways Raosaheb Danve ), इतर मंत्री, आणि कार्यकर्त्यांनी आज ठाण्यात एका हॉटेलमध्ये जात वडा पाव, भजी पाववर यथेच्छ ताव मारला. नाश्ता करताना हे सगळे अगदी तुटून पडलेले पाहायला मिळाले. मात्र चहा, नाश्ता झाल्यानंतर हॉटेलचे ३ हजार ९५० रुपयांचे बिल न देता मंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह निघून गेले आहेत ( Raosaheb Danve Left Hotel Without Paying Bill In Thane ) . सविस्तर वाचा... तर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा..
  • कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला असून दुसरा सामना आज (शुक्रवारी) ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला (West Indies opt to bowl ) होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करुन वेस्ट इंडिजसमोर १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानांचा पाठलाग करत असतांना वेस्ट इंडिजचा ८ धावांनी पराभव झाला. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित ब्रिगेडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. सविस्तर वाचा...
  • मुंबई - 'कपिल शर्मा - आय एम नॉट डन यट' या नेटफ्लिक्स शोनंतर कपिल शर्माने त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कपिल सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अॅपलॉज एंटरटेनमेंट आणि नंदिता दास इनिशिएटिव्हजच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.