ETV Bharat / bharat

अखेर खासगी विमानाने राज्यपाल कोश्यारी डेहराडूनला पोहचले

author img

By

Published : Feb 11, 2021, 5:21 PM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला पोहचले. त्यानंतर येथून ते मसुरीला जाणार आहेत.

अखेर खासगी विमानाने राज्यपाल कोश्यारी डेहराडूनला पोहचले
अखेर खासगी विमानाने राज्यपाल कोश्यारी डेहराडूनला पोहचले

डोईवाला - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला पोहचले. सध्या राज्यपाल डेहराडूमधील आपल्या निवास्थानी राहणार आहेत. त्यानंतर येथून ते मसुरीला जाणार आहेत. भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्यानंतर ते खासगी विमानाने उत्तराखंडला गेले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला पोहचले

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद सुरू आहेत. राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या निवडीलाही राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. सरकारमध्ये यावरून धुसफूस सुरू असतानाच आता विमानप्रवास नाकारल्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

काय प्रकरण?

उत्तराखंडला हिमकडा कोसळून आलेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी निघाले होते. माजी मुख्यमंत्री म्हणून ते उत्तराखंडला निघाले होते. त्याकरिता ते सकाळी विमानात बसले. मात्र, राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याची बाब समोर आली. याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधण्यात आला. परंतु, कोणतेही उत्तर न मिळाल्याने राज्यपालांना विमानातून उतरुन परत माघारी राजभवनावर परतावे लागले. त्यामुळे आता सरकार आणि राज्यपालांमध्ये शीतयुद्ध रंगणार आहे. राज्य सरकारने विमान नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. ते येथे हिमकडा दुर्घटनास्थळाला भेट देणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.