ETV Bharat / bharat

राज्यमंत्री संजय बनसोडे यांची दिल्लीतील सरकारी शाळांना भेट; केजरीवाल सरकारचे शैक्षिणक मॉडेल राज्यात राबविणार - राज्यमंत्री संजय बनसोडे शैक्षणिक मॉडेल

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बिझनेस ब्लास्टर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच अभ्यासक्रमाविषयी जाणून घेतले. यावेळी त्यांनी सरकारी शाळांमध्ये चालणाऱ्या देशभक्ती अभ्यासक्रम आणि स्कूल ऑफ स्पेशलाईज्ड एज्युकेशन मॉडेलची माहिती घेतली. दिल्ली सरकारकडून राबविण्यात येणारे शैक्षणिक मॉडेल महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांची दिल्लीतील सरकारी शाळांना भेट

author img

By

Published : Oct 26, 2021, 7:56 PM IST

नवी दिल्ली- महाराष्ट्राचे भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दिल्लीचे शैक्षणिक मॉडेल महाराष्ट्रातील शाळांमध्ये आणणार असल्याचे सांगितले.

भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री चिराग एन्क्लेव्हमधील कौटिल्य सर्वोदय बाल विद्यालय आणि कालकाजीमधील स्कूल ऑफ एक्सेलन्सला भेट दिली. या सरकारी शाळांमधील आंत्रेप्रेन्युरशिपचा अभ्यासक्रम राज्यमंत्री बनसोडे यांनी जाणून घेतला.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बिझनेस ब्लास्टर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच अभ्यासक्रमाविषयी जाणून घेतले. यावेळी त्यांनी सरकारी शाळांमध्ये चालणाऱ्या देशभक्ती अभ्यासक्रम आणि स्कूल ऑफ स्पेशलाईज्ड एज्युकेशन मॉडेलची माहिती घेतली. दिल्ली सरकारकडून राबविण्यात येणारे शैक्षणिक मॉडेल महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी महाराष्ट्र सरकारला मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. एकमेकांपासून शिकत आपण देशातील शिक्षण व्यवस्था अधिक चांगले करू, असेही सिसोदिया यांनी म्हटले.

हेही वाचा-भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार रोखण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढणे गरजेचे -सोनिया गांधी

दौऱ्यादरम्यान राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी शाळांमधील प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाची पाहणीदेखील केली. शाळांमधील प्रयोगशाळांचे त्यांनी कौतुक केले. सरकारी शाळांमधील प्रयोगशाला या खासगी शाळांहून अधिक दर्जेदार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-तेलंगणा : 3 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश; एके-47 रायफल ताब्यात

विद्यार्थ्यांचा मानसिक विकास

स्टेट काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एंड ट्रेनिंग (एससीईआरटी) महाराष्ट्र आणि लीडरशिप फॉर इक्विटी (एलईएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लाईव्ह चर्चेत शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांनी त्यांच्या शिक्षा मॉडेलबद्दल गतवर्षी माहिती दिली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षण हीच दिल्ली सरकारची प्राथमिकता आहे. आमचे लक्ष्य नेहमीच आमच्या सर्व शाळांसाठी एक मानक ठरवण्यावर राहिले आहे. काही मोजक्या शाळांवर आम्ही लक्ष दिलेले नाही. तसेच विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी आपण त्यांना प्रशिक्षित करू शकतो. मात्र, त्यांचा योग्य मानसिक विकास करणे सगळ्यात महत्त्वाचे

हेही वाचा-तेलंगाणा : मराठमोळ्या IPS अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवाद्यांचा खात्माआहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.