मुंबई - राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून शाळसांठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे.
Big Breaking : राज्यात एक डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग होणार सुरू; शिक्षण विभागाकडून नियमावली जाहीर
20:03 November 29
एक डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरू होणार ; शिक्षण विभागाने जाहीर केली नियमावली
18:04 November 29
खंडणी प्रकरण : गोपाळे, कोरके या पोलीस अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय 7 डिसेंबरपर्यंत ठेवला राखून
मुंबई - मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. निलंबित निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली असून, न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला आहे.
17:57 November 29
उप्पलवाडी परिसरात लागलेल्या आगीत दोन लघू उद्योग कारखाने जळाले
नागपूर - नागपूरच्या कामठीलगतच्या उप्पलवाडी परिसरात सकाळी अचानक दोन गोदामाना आग लागल्याने जळून खाक झाले आहेत. यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे कारण सांगितले जात आहे. नुकसानीचा आकडा अद्याप कळू शकला नाही. या आगीत टायर रिमोल्डिंग तसेच प्लास्टिक पाईप बनवणारे कंपनीचा समावेश आहे. नागपूर महानगर पालिकेच्या अग्नीशमक दलाकडून तब्बल चार ते पाच तास पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सध्या जळालेला मलबा हटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती नागपूर मनपाचे फायर अधिकारी राजेंद्र उचके यांनी माहिती दिली आहे.
15:31 November 29
परमबीर सिंग यांना सीआयडीकडून समन्स जारी
मुंबई - परमबीर सिंग चांदीवाल आयोगातून नवी मुंबई करता निघाले आहेत. परमबीर सिंग यांना सीआयडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे ते CID कार्यालयात जाण्याची शक्यता आहे.
12:52 November 29
कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक दुपारी दोन वाजता राज्यसभेत मांडणार
कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक दुपारी दोन वाजता राज्यसभेत मांडले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
12:46 November 29
कायदे मागे घेणे ही 'त्या' 750 शेतकऱ्यांना आदरांजली; आंदोलन सुरूच राहिल - टिकैत
कौशांबी : कृषी कायदे लोकसभेत मागे घेणे ही आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या 750 शेतकऱ्यांना आदरांजली आहे. एमएसपीसह इतर मुद्दे प्रलंबित असेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले.
12:28 November 29
गोंधळात कृषी कायदे मागे घेतल्यानंतर लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब
कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकास लोकसभेत गोंधळातच मंजुरी
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींकडून विधेयकावर चर्चेची मागणी
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीतच विधेयक पटलावर सादर केले
लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले
11:30 November 29
राज्यसभेचे कामकाजही दुपारी 12.19 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

11:26 November 29
कामकाजाला सुरूवात होताच गदारोळ; लोकसभा 12 वाजेपर्यंत तहकूब
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होतात विरोधकांच्या गदारोळाला सरकारला सामोरे जावे लागले. विविध मुद्द्यांवरून आक्रमक असलेल्या विरोधकांनी गदारोळ घातल्यानंतर सदनाचे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
08:55 November 29
नागपुरातील उप्पलवाडी परिसरातील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

सकाळी 6.30 वाजता सुमारास लागली आग
अग्निशमन दलाच्या 7 गाड्या पोहचल्या, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू
08:15 November 29
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 26 विधेयके मांडली जाणार
आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहेत. या अधिवेशनात सरकारकडून एकूण 26 विधेयके सदनात मांडली जाणार आहेत. संसदेच्या उद्योग सल्लागार समितीची बैठक सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
08:14 November 29
कॅनडात आढळले ओमिक्रॉनचे दोन रुग्ण
कॅनडात ओमिक्रॉन व्हॅरिएन्टचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोघेही अलिकडेच नायजेरियाहून कॅनडात आले होते.
06:08 November 29
Big Breaking : तामिळनाडूला भूकंपाचा सौम्य धक्का
वेल्लोर : तामिळनाडूच्या वेल्लोरला पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी मोजण्यात आली. वेल्लोरपासून 59 किलोमीटर अंतरावर पहाटे 4.17 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का बसला.