ETV Bharat / bharat

Breaking News Live : अमित शाह यांनी नागा नेत्यांची घेतली भेट

Breaking News Live
Breaking News Live
author img

By

Published : Sep 12, 2022, 7:10 AM IST

Updated : Sep 12, 2022, 11:07 PM IST

23:04 September 12

अमित शाह यांनी नागा नेत्यांची घेतली भेट

अमित शाह यांनी नागा नेत्यांची भेट घेतली. विविध मुद्द्यांवर चर्चा केली

22:19 September 12

हिंदी दिवस साजरा करू नका, एचडी कुमारस्वामी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून 14 सप्टेंबर रोजी करदात्यांच्या पैशावर 'हिंदी दिवस' साजरा करू नये कारण हे कन्नडिगांचा अनादर आहे.

22:18 September 12

'आपले मनापासून आभार' गणपती उत्सवातील कामगिरीबाबत राज ठाकरे यांनी मानले प्रशासनाचे आभार

सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनी मनसेच्यावतीने केली कृतज्ञता व्यक्त

कोरोनानंतरचा हा पहिला मोठा सण. हा सण अतिशय उत्सहात पार पडला, आणि तो देखील कोणतंही गालबोट न लागता. यासाठी मानले आभार

पोस्टमध्ये महाराष्ट्र पोलीस, विविध महापालिका, आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि अभ्निशमन दल, महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामाचा उल्लेख.

22:17 September 12

दृश्यकला व अभिकल्प पदवीसाठीराज्य सामाईक प्रवेश परीक्षा 12 सप्टेंबर, आजचा शेवटचा दिवस

दृश्यकला व अभिकल्प पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिनांक ०७ सप्टेंबर ऐवजी ०८सप्टेंबर पासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पाठ्यक्रम व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाईन विकल्प नमुना भरण्यास एक दिवस उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे ही मुदवाढ देण्यात आली आहे. सदरची विकल्प नमुना भरण्याची प्रक्रिया एक दिवस उशिराने सुरू झाल्याने त्यास एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.आज त्याचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांनी अभिकल्प नमुने वेळेच्या आत सादर करावे ;अशी माहिती राज्य आयुक्त रवींद्र जगताप यांनी ईटीव्ही भारतला दिली

21:10 September 12

एका विशिष्ट विचारसरणीमुळे राग आणि द्वेषाचे वातावरण निर्माण झाले-राहुल गांधींची भाजपवर टीका

या देशातील प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे आणि जर कोणी इतर भारतीयांचा द्वेष करत असेल तर तो भारताच्याच कल्पनेचा तिरस्कार करतो. आज आपल्यात एका विशिष्ट विचारसरणीमुळे राग आणि द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तिरुवनंतपुरममध्ये म्हटले आहे.

21:08 September 12

कुटुंबीयांच्या मागणीनंतर सोनिया फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपविले-प्रमोद सावंत

कुटुंबीयांच्या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

21:08 September 12

मुकेश अंबानी यांनी श्रीनाथजी मंदिराला दिली भेट

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी राजस्थान टोडा येथील उदयपूर जवळील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली.

20:22 September 12

केंद्रीय आरोग्य मंत्रालय 17 सप्टेंबरपासून सुरू करणार मेगा रक्तदान कार्यक्रम

केंद्रीय आरोग्य मंत्रालय 17 सप्टेंबरपासून मेगा रक्तदान सुरू करणार आहे.

19:52 September 12

एकवेळा आश्वासन दिले तर मी पुन्हा स्वत:चही ऐकत नाही; मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी

पैठण (औरंगाबाद) - समोर जी गर्दी आहे तीच सांगते बाळासाहेबांची खरी शिवसेना कुणाची आहे असे म्हणत, एकदा मी आश्वासन दिले तर ते पुर्ण करुनच थांबतो. तीथे मग मी स्वत:चही ऐकत नाही, अशी जोरदार भाषणची सुरवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण येथील जाहीर सभेत केली. कॅबीनेट मंत्री संदिपान भुमरे यांनी त्यांच्या पैठण मतदारसंघाच्या वतीने शिंदे यांचा जाहीर सत्कार ठेवला, असता त्या आयोजित कार्यक्रमात ते सोमवारी (१२ सप्टेंबर)रोजी पैठणमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

18:30 September 12

गृहमंत्री स्वत: ८० हजार रुपयांचा मफलर घालतात, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भाजपवर टीका

भाजपला भारतजोडो यात्रेची चिंता का? त्यांना काही काम नाही का? आता ते टी-शर्टवर कमेंट करत आहेत. ते (भाजप) अडीच लाखांचा चष्मा घालतात, गृहमंत्री स्वत: ८० हजार रुपयांचा मफलर घालतात. ते आता टी-शर्टचे राजकारण करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर केली आहे.

18:22 September 12

नवीन संसदेच्या इमारतीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, टीआरएसची मागणी

आमच्या राज्याची मागणी आहे की नवीन संसदेच्या इमारतीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, असे टीआरएस आमदार के कविता यांनी सांगितले.

18:09 September 12

कोणत्याही परिस्थितीत चांगले काम करत राहायचे एवढेच बाळासाहेब व दिघे साहेबांनी आम्हाला शिकविले- एकनाथ शिंदे

कोणत्याही परिस्थितीत चांगले काम करत राहायचे एवढेच बाळासाहेब व दिघे साहेबांनी आम्हाला शिकविले आहे. मात्र, काही ठिकाणी रोड शो होतात. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाठविले जातात, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

17:26 September 12

होर्डिंग्जवर क्यूआर कोड बंधनकारक होण्याची शक्यता; उच्च न्यायालयात याचिका

होर्डिंग्जवर आता क्यूआर कोड बंधनकारक करण्याचे विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश दिले आहे. महाराष्ट्रातील होर्डिंग्जविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका QR codes mandatory on illegal hoardings दाखल करण्यात आली होती. येणाऱ्या काळात प्रत्येक होर्डींगवर 'क्यूआर कोड' बंधनकारक होण्याची चिन्ह आहे. 13 ऑक्टोबरला यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय सविस्तर आदेश जारी करणार आहे.

16:34 September 12

थोड्याच वेळाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबादमध्ये सभा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे.

15:54 September 12

ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी घेण्यास कोर्टाचा होकार; पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी घेण्यास कोर्टाने होकार दिला आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

13:05 September 12

केंद्रीय मंत्री नारायण राणे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या भेटीला

नवी मुंबईत मुलांना सोडविण्यासाठी गेलेल्या शाळेच्या बसला आग

10:45 September 12

नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात, आज आणि पुढील काही दिवस यलो अलर्ट

नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात, आज आणि पुढील काही दिवस यलो अलर्ट आहे

09:29 September 12

दोन नायजेरियन कैद्यामध्ये झालं भांडण.. एका कैद्याने कापला दुसऱ्या कैद्याचा कान

गोवा येथील कोलवाळे जेलमध्ये दोन नायजेरियन कैद्यामध्ये झालं भांडण.. एका कैद्याने कापला दुसऱ्या कैद्याचा कान.

08:38 September 12

देशात अनेक ठिकाणी गुंडांच्या अड्ड्यांवर एनआयएचे छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, गुंडांच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या काही तपासात विशेषतः पंजाबच्या गुंडांचे आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी असलेले संबंध समोर आले आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांच्या हत्येशी संबंधित संशयित दहशतवादी टोळ्यांसंदर्भात एनआयए दिल्ली, एनसीआर, हरियाणा आणि पंजाबमध्ये विविध ठिकाणी शोध घेत आहे.

06:25 September 12

Breaking News Live : अमित शाह यांनी नागा नेत्यांची घेतली भेट

ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणात मे महिन्यापासून सुरू झालेल्या खटल्याचा आज वाराणसी जिल्हा न्यायालयात निकाल येणार आहे. शृंगार गौरी नियमित दर्शन पूजन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खटल्याची सुनावणी सुरू होती.

Last Updated : Sep 12, 2022, 11:07 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.