ETV Bharat / bharat

महाराष्ट्र एटीएसचे गांजा तस्करीच्या प्रकरणात हिमाचलमध्ये छापे

महाराष्ट्र एटीएसने टाकलेल्या छाप्यामुळे अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. काही कागदपत्रे घेऊन एटीएसचे अधिकारी महाराष्ट्रात वापस गेले आहेत.

गांजा तस्करी
गांजा तस्करी
author img

By

Published : Jan 6, 2021, 10:15 PM IST

कुल्लू - पुण्यातील अमली पदार्थ तस्करीचे धागेदोरे हिमाचल प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत. कुल्लूमधील मणिकर्ण खोऱ्यात मणिकर्ण व कसोलमध्ये अमली पदार्थ तस्करी प्रकरणात सामिल असलेल्या दोन संशयितांच्या घरी महाराष्ट्र एटीएसने छापा टाकले आहेत.

महाराष्ट्र एटीएसने टाकलेल्या छाप्यामुळे अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. काही कागदपत्रे घेऊन एटीएसचे अधिकारी महाराष्ट्रात वापस गेले आहेत.

कुल्लू पोलिसांचे पथकही कारवाईत सहभागी-

कुल्लुमधील रहिवासी असलेल्या दोन आरोपींकडून पोलिसांनी पुण्यामधून 2 किलो 34 चरस जप्त केले होते. या प्रकरणाची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे हिमाचल प्रदेशात आढळले. त्यानंतर एटीएसने हिमालच प्रदेशमध्ये टाकलेल्या छाप्यात कुल्लू पोलिसांचे पथकही सामिल झाले. मात्र, हिमालच प्रदेशामध्ये कोणत्याही नवीन आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. डीजीपी संजय कुंडू म्हणाले की, एटीएसने कारवाई केली आहे. मात्र, एटीएसचे पथक परत महाराष्ट्रात गेले आहे.

हेही वाचा-'सीएसआर' निधी विनियोगासाठी गोवा सरकार करणार कंपनी स्थापन

डीजीपीकडून कठोर कारवाई करण्याचे आदेश-

कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या माहितीनुसार चरसचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यामुळे तपास करत पथक कुल्लूपर्यंत आले होते. मणिकर्ण आणि कसौलमध्ये आरोपींच्या राहत्या जागांवर छापे मारण्यात आले आहेत. पोलिसांकडून चरस तस्करांबाबत अधिक माहिती व गोपनीय सूचना एकत्रितपणे मिळवित आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंह म्हणाले की, डीजीपीने तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बटालियन कमांडट यांनाही कारवाईची परवानगी दिली आहे.

हेही वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्याही दिवशी बर्फवृष्टी, खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला

गांजाचे राज्य म्हणून उद्धव ठाकरेंनी केली होती टीका-

दसऱ्याच्या मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उल्लेख न करता अभिनेत्री कंगना राणौतवर टीका केली होती. टीकेत त्यांनी गांजाची शेती होणारे राज्य म्हटल्याने हिमाचल प्रदेश असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले होते. त्यावर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. दरम्यान, मूळ हिमाचल प्रदेशची रहिवासी असलेली अभिनेत्री कंगना राणौतने सातत्याने महाविकास आघाडीवर आणि मुंबईवर टीका केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.