ETV Bharat / bharat

Mahadev App scam : ईडीची मोठी कारवाई, सनी लियॉनसह टायगर ईडीच्या पिंजऱ्यात? मुंबईबरोबर अनेक ठिकाणी छापे - अभिनेता टायगर श्रॉफ

Mahadev App Scam : महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, ईडीनं कोलकाता, भोपाळ आणि मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकून ४१७ कोटी रुपयांचं अवैध उत्पन्न जप्त केलं. यात अनेक सितारे रडारवर आहेत. यामुळे बॉलीवूड विश्वात खळबळ माजली आहे.

ईडीची मोठी कारवाई
Mahadev App scam
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 2:31 PM IST

Updated : Sep 15, 2023, 3:06 PM IST

नवी दिल्ली Mahadev App scam : महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) ऑनलाइन जुगार अ‍ॅपवर मोठी कारवाई केली. या प्रकरणी ईडीनं कोलकाता, भोपाळ आणि मुंबई येथे छापे टाकत ४१७ कोटी रुपये जप्त केले आहेत. महादेव betting app चा प्रमोटर सौरभ चंद्रकारच्या लग्नात चित्रपटसृष्टीतले नामवंत झाले होते. यात सहभागी अभिनेता टायगर श्रॉफ, कृष्णा अभिषेक, पार्श्वगायिका नेहा कक्कड, पार्श्वगायक आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी, कॉमेडियन भारती सिंग, अभिनेत्री सनी लियॉनी, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुसरत भरुचा आदी सेलिब्रिटीही विवाह सोहळ्याला होते उपस्थित होते. युएईमध्ये विवाह सोहळा झाला. मुंबईतील एका पीआर कंपनीमार्फत मोठी फी देऊन चित्रपटसृष्टीतले नामवंत सोहळ्याला उपस्थित राहिले होते. सौरभ चंद्रकारच्या लग्नासाठी दीडशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा रोखीने व्यवहार झाल्याचा सूत्रांनी दावा केला आहे.

मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त केले : आर्थिक तपास एजन्सीनं शुक्रवारी एका निवेदनात सांगितलं की, ED नं अलीकडेच कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये विविध ठिकाणी महादेव अ‍ॅपशी जोडलेल्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या विरोधात शोध मोहीम राबवली. या प्रकरणी मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेलं ४१७ कोटींचं अवैध उत्पन्न गोठवण्यात आलंय. एजन्सीनं सांगितले की, या प्रकरणाच्या तपासात असं समोर आले आहे की, छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल हे महादेव ऑनलाइन बुकचे मुख्य प्रवर्तक आहेत. ते दुबईमधून हे सर्व ते चालवत होते. महादेव ऑनलाइन बुकचं यूएईमध्ये मध्यवर्ती मुख्यालय आहे.

बॉलीवूड विश्वात खळबळ : बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ, गायिका नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान,विशाल ददलानी यासह अनेक दिग्गज ईडीच्या रडारवर आहेत. भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचही नाव तपासात समोर आल्याने बॉलीवूड विश्वात खळबळ माजली आहे. बॉलिवूडमधील १४ पेक्षा अधिक नाव ईडीच्या रडारवर आहेत. महादेव बेटींग अँपच्या माध्यमातून करोडोंची अफरातफर होत असून काही सेलिब्रिटी आणि सरकारी अधिकाऱ्यांना यातून पैसे गेल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याचा ईडीच्या तपासात समोर आलं आहे. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रोख रक्कम आणि १३ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला आढळून आले आहेत.

लग्नासाठी दीडशे कोटींपेक्षा जास्त रोख व्यवहार : महादेव बेटिंग ऍपचा प्रमोटर सौरभ चंद्रकारच्या लग्नात चित्रपटसृष्टीतले नामवंत सहभागी झाले होते. अभिनेता टायगर श्रॉफ, क़ष्णा अभिषेक, पार्श्वगायिका नेहा कक्कड, पार्श्वगायक आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी, कॉमेडियन भारती सिंग, अभिनेत्री सनी लियॉनी, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुसरत भरुचा आदी सेलिब्रिटीही विवाह सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे ते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. युएईमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता. मुंबईतील एका पीआर कंपनीमार्फत गलेलठ्ठ शुल्क देऊन चित्रपटसृष्टीतले नामवंत व्यक्ती विवाह सोहळ्यात हजर झाले होते. सौरभ चंद्रकारच्या लग्नासाठी दीडशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमांचा रोख व्यवहार झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. Naresh Goyals ED Custody: नरेश गोयल यांना पुन्हा 14 सप्टेंबरपर्यंत कोठडी, पत्नीसोबत बोलण्याची न्यायालयानं दिली परवानगी
  2. Bhaskar Jadhav On BJP : भास्कर जाधवांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, फक्त ईडी, सीबीआय...
  3. Sanjay Raut News: संजय राऊत यांच्या रडारवर शिंदे गटासह भाजपचे तीन नेते निशाण्यावर, लवकरच ईडीकडे करणार तक्रार

Last Updated : Sep 15, 2023, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.