ETV Bharat / bharat

Madurai Train Fire : मदुराई रेल्वेतील आगीच्या दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, ट्रॅव्हल एजन्सीकडून 22 वर्षांपासून नियमांचे उल्लंघन - भसीन टूर अँड ट्रॅव्हल्स

शनिवारी सकाळी झालेल्या मदुराई रेल्वे अपघाताबाबत नवा खुलासा झालाय. ट्रेनच्या बोगीला आग कशामुळे लागली याचं कारण आता उघडकीस आलंय. ट्रॅव्हल्स एजन्सीचा गलथानपणा यासाठी कारणीभूत आहे. (Madurai Train Fire reason)

Madurai Train Fire
मदुराई रेल्वेला आग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 9:01 AM IST

लखीमपूर खेरी : तामिळनाडूतील मदुराईजवळील शनिवारी सकाळी पर्यटक ट्रेनच्या बोगीला भीषण आग लागली. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. या आगीच्या घटनेची चौकशी रविवारी सदर्न सर्कल रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अंतर्गत केली जाईल, असं दक्षिण रेल्वेनं सांगितलय. आता याबाबत एक धक्कादायक खुलासा झालाय. या बोगीला आग कशी लागली याचं कारण आता समोर आलंय.

Madurai train fire
मृतांची यादी

अशी लागली आग : उत्तर प्रदेशातल्या सीतापूरची भसीन टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी वर्षानुवर्षे लोकांना धार्मिक सहलीला घेऊन जाते. या टूर एजन्सीचा मालक पप्पू उर्फ हरीश भसीन सुमारे २२ वर्षांपासून ट्रेनमध्ये सिलिंडर आणि डिझेल स्टोव्ह घेऊन जात होता, असं उघडकीस आलंय. शनिवारी याच सिलिंडरला आग लागल्यानं अपघात हा झाला. यामध्ये टूर ऑपरेटर पप्पूलाही आपला जीव गमवावा लागला. मदुराई प्रशासनाने शनिवारी रात्री उशिरा मृतांची यादी जाहीर केली तेव्हा त्यात त्याचंही नाव होतं. भसीन टूर अँड ट्रॅव्हल्सचे सीतापूर जिल्ह्यात छोटं कार्यालय आहे. एजन्सीच्या टूरवर वर्षानुवर्षे डिझेल आणि रॉकेलवर चालणारे गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह नेले जात असल्याचं सांगण्यात आलं.

  • An inquiry into the Madurai train coach fire incident will be held today under the Southern Circle Railway Safety Commissioner: B.Guganesan, Chief Public Relations Officer, Southern Railway pic.twitter.com/NOqJB7qp2X

    — ANI (@ANI) August 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्रेनमध्ये गॅसच्या भट्टीवर अन्न शिजवले जायचे : गेल्या 22 वर्षांपासून पप्पू उर्फ ​​चार धाम यात्रा, वैष्णो देवी यात्रा, काठमांडू किंवा इतर कोठेही सहज सहलीचं आयोजन करायचा. त्याचे रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा दलांसोबत साटेलोटे होते. त्यामुळे तो आपल्या डब्यात सिलिंडर आणि मोठे डिझेल स्टोव्ह सहजपणे घेऊन जात असे. त्याचा डबा जणू फिरती पँट्री कार होती. लखीमपूरमधील काशीनगरमध्ये राहणारे रमेश वर्मा सांगतात की, आम्ही भसीन टूर अँड ट्रॅव्हलच्या टूरला गेलो होतो. खाण्यापिण्याची कोणतीही अडचण आली नाही. टॉयलेटजवळ गॅसच्या भट्टीवर अन्न शिजवले जात असल्याने मला थोडी भीती वाटायची. मात्र टूर पॅकेज स्वस्त असल्यामुळे कोणी काही बोलत नसे.

सिलिंडरला गळती लागल्याने आग भीषण झाली : सीतापूरचे शिवकुमार चौहान यांनी या अपघातात आपला मेव्हणा आणि पत्नीला गमावले. त्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली. 'त्यावेळी सकाळची वेळ होती. बोगी चारही बाजूंनी बंद होती. तामिळनाडूतील मदुराई स्टेशनवर सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था केली जात होती. तेव्हा अचानक बोगीला आग लागली. सिलिंडरला गळती लागल्याने आग एवढी भीषण झाली की, त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. तेव्हा बहुतेक लोक सकाळची झोप घेत होते. आग लागल्यानंतर काहींनी ट्रेनमधून उडी मारून पळ काढला. मात्र तोपर्यंत आग खूप जास्त पसरली. त्यानंतर फायर स्टेशनला फोन करण्यात आला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता', असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Tourism Train Coach Fire : पर्यटक रेल्वे गाडीच्या डब्याला आग, मदुराईत ९ प्रवाशांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.