भोपाळ Madhya Pradesh Assembly Election Result २०२३ : रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली, तर काँग्रेस पिछाडीवर पडली होती. २३० विधानसभा मतदारसंघांच्या या राज्यात बहुमताचा जादुई आकडा ११६ इतका आहे. तो भाजपाने सहजपणे पार केला आहे. मध्ये प्रदेशात भाजपाला 163 जागांवर विजय मिळवता आला, तर काँग्रेसला 66 जागांवरच विजय प्राप्त झाला. इतरांच्या खात्यात 1 जागा आली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना भाजपाचा प्रश्न : या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवरील वक्तव्ये केली होती. ही वक्तव्ये केवळ खालच्या पातळीची नाही, तर असंसदीय होती. काँग्रेसच्या नेत्यांनी अशी टीका केली, जिचा सार्वजनिक ठिकाणी पुनरुच्चारही करता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणं म्हणजे ओबीसींना शिवी देणं आहे हे त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं का? असा प्रश्नही आता भाजपा नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना विचारला आहे.
बुधनी मतदारसंघातून शिवराज सिंह चौहान विजयी : या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रामेश्वर शर्मा यांनी काँग्रेसचे नरेश ग्यानचंदानी यांचा पराभव केला. भोपाळच्या हुजूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रामेश्वर शर्मा यांनी काँग्रेसच्या नरेश ग्यानचंदानी यांचा पराभव केला. बुरहानपूर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार अर्चना चिटणीस विजयी झाल्या आहेत. नरसिंगपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रल्हाद पटेल विजयी झाले आहेत. इंदर सिंह यांनी शाजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. शिवराज सिंह चौहान हे खासदार बुधनी या हायप्रोफाईल जागेवरून विजयी झाले आहेत. अमरवाडामधून भाजपाच्या उमेदवार मोनिका शाह बत्ती यांचा पराभव झाला आहेत. भोपाळ उत्तरमधून भाजपाचे उमेदवार आलोक शर्मा पराभूत झाले आहेत. भोपाळच्या गोविंदपुरा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कृष्णा गौर विजयी झाले आहेत.
दिमानीमधून तोमर विजयी : मध्य प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसलाय. केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते पराभूत झालेत. तर दिमानी मधून नरेंद्रसिंह तोमर विजयी झाले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ग्वाल्हेर भागातील दिमानी या हायप्रोफाईल मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मतमोजणीच्या 19 फेऱ्यांनंतर तोमर यांनी निवडणूक जिंकली आहे. शिवराज सिंह चौहान हे बुधनी येथून विजयी झाले आहेत.
हेही वाचा: