ETV Bharat / bharat

'लाडली'मुळं मध्य प्रदेशात पुन्हा एकदा शिव'राज'; पाचव्यांदा भाजपानं कशी मिळवली सत्ता?

Madhya Pradesh Assembly Result 2023 : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला चारी मुंड्या चीत करत भाजपानं राज्यात पुन्हा सत्ता मिळवलीय. या राज्यात भाजपानं जोरदार प्रचार केला. वेळप्रसंगी आपली रणनीतीही बदलली. यामुळेच भाजपाला मध्य प्रदेशात एकहाती बहुमत मिळवता आलं.

Madhya Pradesh Assembly Result 2023
Madhya Pradesh Assembly Result 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 7:53 AM IST

Updated : Dec 4, 2023, 2:14 PM IST

हैदराबाद Madhya Pradesh Assembly Result 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं प्रचंड बहुमतासह विजय मिळवलंय. राज्यातील एकूण 230 जागांपैकी तब्बल 163 जागांवर भाजपाचं कमळ फुललंय. तर काँग्रेसला केवळ 66 जागांवरच विजय मिळवता आलाय. मध्य प्रदेशात भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात जोरदार लढत होणार असं बोललं जात होतं. मात्र भाजपानं सर्व अंदाज खोटे ठरवत दणदणीत विजय मिळवलाय. 2018 चा अपवाद वगळता सलग पाचव्यांदा मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता येणार आहे. भाजपाच्या या विजयामागे अनेक कारणं आहेत.

बहिणीच्या खात्यात पैसे, मामाला दिली मते : मध्यप्रदेशातील भाजपाच्या विजयाचं सर्वात मोठं कारण 'लाडली बहना' योजना ठरलीय. ही योजना सुरु करुन भाजपाने महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याअंतर्गत 1.31 कोटी महिला मतदारांची ओळख पटली. सुरुवातीला या योजनेची रक्कम 1000 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र नंतर ती वाढवून 1250 रुपये करण्यात आली. या योजनांच्या मदतीनं भाजपानं जनतेच्या मनाचं मतांमध्ये रुपांतर केलं.

  • After the completion of the counting of votes for the Madhya Pradesh Assembly Elections, BJP won 163 seats and Congress won 66 seats. pic.twitter.com/ztOVEPgI9E

    — ANI (@ANI) December 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर सस्पेन्स : राज्यात एक गोष्ट सर्वात ठळक होती ती म्हणजे शिवराज निवडणूक लढवत होते. तसेच जनतेच्या रोषाला सामोरं जात होते. मात्र, संपूर्ण निवडणुकीत भाजपानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही. याचाही भाजपाला फायदा झाला. या निवडणूक प्रचारात पक्षानं प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा, रोड शो करत पक्षाला सत्तेच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग सोपा केला. यामुळं राज्यातील सत्ताविरोधी लाट संपली. त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत झाला. तसंच, पक्षानं निवडणुकीची जबाबदारी केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री यांच्याकडे सोपवली.

  • हिंदुत्वाचा फॅक्टर ठरला महत्त्वाचा : मध्य प्रदेश निवडणूकीत कॉंग्रेसलाही हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागला. मात्र जनतेनं प्रत्यक्षात भाजपाच्या हिंदुत्वाची निवड केली. राज्यातील अनेक मंदिरांचं चित्र बदललंय. उज्जैन धामासारखा इतर धार्मिक स्थळांचाही विकास होत आहे. याचाही फायदा भाजपाला झाला.
  • मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री घरी : भाजपानं मध्य प्रदेशात 163 जागा जिंकत सत्ता कायम राखली असली तरी मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यात गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांचाही समावेश आहे. यांच्यासह आदिवासी कल्याण मंत्री मीणासिंह, कृषिमंत्री कमल पटेल, पंचायत राज व ग्रामविकास मंत्री महेंद्रसिंह, सामाजिक न्यायमंत्री प्रेमसिंह पटेल, सहकार मंत्री अरविंद भदोरिया, तर मंत्री सुरेश धाकड यांचा निवडणूकीत पराभव झालाय.
  • भाजपाचा उमेदवार 28 मतांनी विजयी : मध्य प्रदेशातील शाजापूर मतदारसंघात अतिशय अटीतटीची लढत झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे अरुण भिमवड हे सुरुवातीला 150 मतांनी विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र कॉंग्रेसचे उमेदवार काराडा हुकुमसिंह यांनी आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. यानंतर भाजपाचे अरुण भिमवड हे अवघ्या 28 मतांनी विजयी झाले.

हेही वाचा :

  1. मध्य प्रदेश निवडणूक निकाल 2023 : भाजपाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत; काँग्रेसचा प्लॅन फसला
  2. राजस्थानमधील शिवसेनेच्या एकमेव उमेदवाराचा निकाल काय लागला? मुख्यमंत्री गेले होते प्रचाराला
  3. तेलंगाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; 'बीआरएस'च्या कारला लागला ब्रेक, भाजपाचाही वाढला आकडा

Last Updated : Dec 4, 2023, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.