हैदराबाद प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यामुळे त्या नेहमीच सुंदर दिसण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधने Beauty Products वापरत असतात. अशा स्थितीत अनेक महिला त्यांच्या चेहऱ्याला शार्प लूक देण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतात. तथापि, सौंदर्यावर उपचार घेण्याआधी नक्कीच शंभर वेळा विचार करा, कारण ब्रिटनमधील एका २५ वर्षीय महिलेला शस्त्रक्रिया करणे महागात पडले आहे.
जाणून घेऊ या नक्की काय घटना घडली ब्रिटनमधील सिरीन नावाची 25 वर्षीय महिला बल्गेरियात सुट्टीसाठी गेली होती. जिथे ती टॅनिंगसाठी अर्धा तास उन्हात पडून राहिली आणि तिच्या चेहऱ्याची दयनीय अवस्था झाली.
सिरीन मुराद बल्गेरियात सुट्टीवर गेली होती. दरम्यान, ही महिला कुटुंबासह सनी बीचवर गेली होती. त्यावेळी सकाळची वेळ व तापमान २१ अंश सेल्सिअस होते. अशा परिस्थितीत सिरीन चेहऱ्यावर सनस्क्रीन न लावता उन्हात झोपली. सिरीनला येथे फक्त 5 मिनिटे विश्रांतीसाठी पडायचे होते, परंतु तिचा डोळा लागला आणि अर्ध्या तासानंतर ती उठली तेव्हा तिचा चेहरा पाहून तिला धक्काच बसला. उन्हात झोपल्याने सिरीनचा चेहरा लालबुंद झाला होता.
त्या दिवशी सिरीनला तिच्या चेहऱ्याला काय झाले हे समजू शकले नाही, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सिरीनला जाग आली तेव्हा तिचा चेहरा पाहून तिला धक्काच बसला. सिरीनच्या लक्षात आले की, तिचा चेहरा भाजला आहे आणि तिच्या कपाळावरची त्वचा आकुंचित होऊ लागली आहे. हळूहळू ती त्वचा वितळू लागली. सिरीन मुराद या ब्युटीशियन आहेत हे जाणून आश्चर्य वाटेल. आता सिरीननेच सल्ला दिला आहे की, शस्त्रक्रिया करणाऱ्यांनी सनस्क्रीनशिवाय उन्हात जाऊ नये. सिरीन खूप भाग्यवान समजते आहे की, आता तिचा चेहरा पूर्णपणे बरा झाला आहे.