ETV Bharat / bharat

LUCKNOW PUBG CASE : मुलाला पाच हजार रुपयांत आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती - IN RUPEES FIVE THOUSAND

राजधानी लखनऊमध्ये बुधवारी पब्जी गेम खेळण्यास नकार दिल्याने मुलाने आईची हत्या केली होती. त्यानंतर आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ( DISPOSE MOTHER DEAD BODY ) त्याने मित्रासोबत ५ हजार रुपयांत ( IN RUPEES FIVE THOUSAND) सौदा केला होता. हा प्रकार लखनौ पब्जी प्रकरणात (LUCKNOW PUBG CASE ) समोर आला आहे.

LUCKNOW PUBG CASE
लखनौ पब्जी प्रकरण
author img

By

Published : Jun 9, 2022, 9:55 PM IST

लखनऊ: आईच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करणारा मुलगा केवळ खुन करुन थांबला नाही, तर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही नियोजन केले होते. पण, मित्राने शेवटच्या वेळी त्याला फसवले आणि राज सर्वांसमोर आला. आईची हत्या केल्यानंतर लखनऊच्या पीजीआय परिसरात 16 वर्षीय मुलाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्राला पटवून 5 हजारात सौदाही केला होता हे समोर आले आहे. लष्करी अधिकाऱ्याची पत्नी साधना हिची तिच्या 16 वर्षांच्या मुलाने स्वतः गोळी झाडून हत्या केली. इतकेच नाही तर त्याने 3 दिवस निष्काळजीपणे आईचा मृतदेह घरी तसाच ठेऊन मित्रांसोबत पार्टी करत राहिला.

त्याने आपल्या 10 वर्षांच्या बहिणीलाही आईच्या मृतदेहासोबत राहण्यास भाग पाडले, कारण मुलाने सर्व नियोजन केले होते. आईच्या मृतदेहाची विल्हेवाट केव्हा आणि कशी लावायची याची स्क्रिप्ट तयार होती. यासाठी त्याने आपल्या एका मित्राला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सज्ज केले. यासाठी त्याने मित्राला ५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण, एका प्रसंगात तो मित्र घाबरला आणि त्याने नकार दिला.

मित्र राजी झाला नाही, तर मुलाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 5 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले, भीतीपोटी त्याने नकार दिल्याचे आरोपी मुलाच्या मित्राने सांगितले. यामुळे तो संतापला आणि त्याने बंदूक दाखवून त्यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. यावर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला आणि जनरल स्टोअर चालवणाऱ्या काकांना सांगितले.

छतावरून कोणीतरी येऊन आईची हत्या केल्याचे वडिलांना सांगितले, आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरत होते. मित्रानेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास नकार दिल्याने आरोपी मुलाने त्याच दिवशी रात्री आठ वाजता त्याचे आर्मी वडील नवीन सिंग यांना फोन करून वडिलांना गच्चीतून घरात घुसून कोणीतरी आईची हत्या केल्याचे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.