नवी दिल्ली : आधिच महागाई मुळे त्रस्त असलेल्या जनतेला आता व्यावसायिक सिलेंडरच्या वाढलेल्या दराचा फटका बसणार आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 1 नोव्हेंबर रोजी 266 रूपयांची घसघसीत वाढ केली गेली होती. त्याच वेळी 19.2 किलो गॅस असलेल्या या सिलेंडरचा दर 2000 पार गेला होता.
रेस्टाॅरंट महागणार
सध्या घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नसली तरी त्याच्या किंमती 1000 च्या जवळ पोचल्या आहेत. त्व्यवसायिक सिलेंडर चे दर वाढल्यामुळे रेस्टाॅरंट महागण्याची शक्यता आहे. सरकार सिलेंडर वरील सबसिडी बंद करत असल्यामुळे ही दरवाढ होत असल्याच सांगितले जात आहे.
29 कोटी ग्राहक
भारतात सुमारे 29 कोटी ग्राहकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. त्यातील 8.8 कोटी उज्वला योजनेचे ग्राहक आहेत. घरगुती गॅसची सबसिडी बंद करण्याचे संकेत केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करतानाच दिले होते.