ETV Bharat / bharat

LPG Cylinder Price : महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर, जाणून घ्या काय आहेत नवे दर?

author img

By

Published : Sep 1, 2022, 8:37 AM IST

Updated : Sep 1, 2022, 9:33 AM IST

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात LPG Cylinder Price कपात करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी, चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त होणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी commercial gas cylinder prices reduced झाल्याचा फायदा देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार आहे.

LPG CYLINDER PRICES ON 1 SEPT 2022 COMMERCIAL GAS CYLINDER REDUCED
महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर, जाणून घ्या काय आहेत नवे दर?

नवी दिल्ली : देशातील महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या दरात LPG Cylinder Price कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही दरकपात केवळ व्यावसायिक सिलिंडरवरच झाली commercial gas cylinder prices reduced आहे. तर 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध आहे.

1 सप्टेंबरपासून दिल्लीत इंडेनच्या एका 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी, चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त होणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याचा फायदा देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार आहे.

मेट्रो शहरांमध्ये अशी आहे स्थिती : दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1976.50 ऐवजी 1885 रुपये असेल. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये किंमती 1995.5 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. तर आधी ते 2095 रुपये होते. मुंबईत सिलेंडरची किंमत 1844 रुपयांवर आली आहे.

घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिरच : 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच सिलिंडर अजूनही त्याच किमतीत मिळेल. इंडेन सिलिंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये असेल, तर कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052 रुपये, चेन्नईमध्ये 1068 रुपये असेल.

हेही वाचा : स्वस्तामध्ये मिळतोय एलपीजी कंपोझिट सिलेंडर, 'अशी' होती ग्राहकांची धूळफेक

Last Updated : Sep 1, 2022, 9:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.