ETV Bharat / bharat

Love Jihad case: नाव बदलून केलं हिंदू मुलीशी लग्न, नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकत दिरांसह मौलानाने केला बलात्कार - ग्वालियर धर्म परिवर्तन प्रकरण

ग्वाल्हेरमध्ये एका मुस्लिम तरुणाने हिंदू बनून हिंदू मुलीशी लग्न केले. लग्नानंतर तरुणाने महिलेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव ( Religion conversion case gwalior ) टाकला. यादरम्यान तिच्या दोन दिरांसह एका मौलानाने तिच्यासोबत बलात्कार केला. महिलेचा आरोप आहे की, तिचे सासरचे लोक तिला वेश्याव्यवसायात ढकलू पाहत होते. तिला अनेक महिने ओलीस ठेवण्यात आले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली ( Love jihad case in gwalior ) आहे.

MP Police
मध्यप्रदेश पोलीस
author img

By

Published : Apr 26, 2022, 3:50 PM IST

ग्वाल्हेर ( मध्यप्रदेश )- मध्यप्रदेशात लव्ह जिहादचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले ( Religion conversion case gwalior ) आहे. एका तरुणाने नाव बदलून हिंदू तरुणीशी मैत्री केली. तिच्याशी लग्न करून त्याने तिच्यावर बलात्कारही केला. आरोपी पतीने या तरुणीला त्याचे दोन भाऊ आणि एका मौलानाच्या स्वाधीन केले. त्यानंतर या तिघांनीही महिलेला वासनेची शिकार बनवले. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली ( Love jihad case in gwalior ) आहे.

नाव बदलून जाळ्यात अडकवले : ग्वाल्हेरच्या गोल पहारिया येथील एका तरुणीने महिला पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिने सांगितले की, डबरा येथे राहणाऱ्या इम्रान या तरुणाने तिला त्याचे नाव राजू असल्याचे सांगत तिच्याशी जवळीक वाढवली. प्रेमाचे नाटक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. गर्भपात केल्यानंतर तरुणाने तिच्याशी लग्न केले. जेव्हा ती लग्न करून पतीसोबत राहू लागली तेव्हा एक मौलाना आला आणि 'तुझा निकाह वैध नाही', असे सांगितले. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर मुस्लिम रितीरिवाजांनुसार विवाह करावा लागतो, असे तो म्हणाला.

हिंदू बनून केलं मुलीशी लग्न, नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकत दिरासह मौलानाने केला बलात्कार

महिलेला वेश्याव्यवसायात करण्यास भाग पाडले जात होते: महिलेने आरोप केला आहे की, तिने धर्मांतर करण्यास नकार दिल्यावर तिचे दोन मेव्हणे आणि नंतर मौलाना यांनीही तिच्यावर बलात्कार केला. सासूने आपल्याला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोपही महिलेने केला आहे. तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. त्यादरम्यान काही तरुण येऊन तिच्यावर बलात्कार करत असत. 20 एप्रिल रोजी महिला ज्या खोलीत बंद होती त्या खोलीला कुलूप लावायला सासरचे लोक विसरले. त्यानंतर महिलेने डबरा येथून ग्वाल्हेरमधील तिच्या माहेरच्या घरी पळ काढला आणि घरातील सदस्यांना संपूर्ण हकीकत सांगितली.

दोन आरोपींना अटक : ग्वाल्हेरच्या महिला पोलीस स्टेशनने महिलेचा कथित पती इम्रान उर्फ ​​राजू जाटव, सुगा बेगम, देवर अमान, मौलाना ओसामा खान यांच्यासह दोन अज्ञात लोकांविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि ओलीस ठेवण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण डाबरा पोलीस ठाण्याचे असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे. ग्वाल्हेरचे एसपी अमित सांघी यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत मुख्य आरोपीसह दोन आरोपींना अटक केली असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

हेही वाचा : Young Woman Rape In Jalna : धक्कादायक; लघुशंकेस गेलेल्या तरुणीस उचलून नेऊन केला बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.