ETV Bharat / bharat

विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा गोंधळ; लोकसभेचे कामकाज पुन्हा स्थगित, राज्यसभेचे कामकाज सुरू

लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. तर राज्यसभेत खासदार हे वेल ऑफ द हाऊसमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी जमा झाले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

Lok Sabha
Lok Sabha
author img

By

Published : Aug 3, 2021, 12:01 PM IST

Updated : Aug 3, 2021, 12:35 PM IST

नवी दिल्ली - संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी पेगासस हेरगिरी, कृषी कायदे यासारख्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. सरकारकडून मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. अशातच लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित करण्यात आले होते. दुपारी बारानंतरही पुन्हा लोकसभेचे कामकाज स्थगित झाले. राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.

लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. तर राज्यसभेत खासदार हे वेल ऑफ द हाऊसमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी जमा झाले होते. सीपीआयचे खासदार बिनोय विश्वम यांनी पेगासस प्रोजक्टवर चर्चा करण्यासाठी नियम 267 नुसार राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्याची नोटीस दिली.

इनलँड व्हेसलचे विधयेक हे सोमवारी मंजूर झाले आहे. सोमवारी राज्यसभेचे चारवेळा कामकाज स्थगित करण्यात आले आहे. राज्यसभेत पाच विधेयके मंजूर झाली आहेत. कारखाना सुधारणा विधेयक, सागरी मदत आणि नेव्हिगेशन विधेयक, अल्पवयीन न्याय सुधारणा या विधेयकांचा समावेश आहे.

दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी महागाई विरोधात कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्लब ते संसदेपर्यंत सायकल मार्च काढला आहे.

हेही वाचा-पाकव्याप्त काश्मीरसह जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य - टी. एस. त्रिमुर्ती

संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार -

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले आहे. काही विधेयके सोडली, तर राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कामकाज झालेले नाही. पेगासस आणि शेतकरी आंदोलनावरून विरोधक संसदेत प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे आतापर्यंत संसदेचे कामकाज बाधित होत आहे. संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा-विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा गोंधळ; संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित

Last Updated : Aug 3, 2021, 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.