ETV Bharat / bharat

Byelection results 2022 : चारही राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची निराशा; शत्रुघ्न सिन्हासह बाबुल सुुप्रियो विजयी

author img

By

Published : Apr 16, 2022, 2:48 PM IST

Updated : Apr 16, 2022, 5:38 PM IST

महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव ( Jayashri Jadhav won in election ) यांनी सत्यजित कदम यांचा दणदणीत पराभव केला. चोविसाव्या फेरीतच जाधव यांनी आपला विजय निश्चित केला होता. यामुळे भाजप बॅकफूटवर गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने सपाटून मार खाला आहे.

बाबुल सुप्रियो विजयी
बाबुल सुप्रियो विजयी

नवी दिल्ली - दिल्ली : चार राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या विधानसभा जागा काँग्रेसने काबीज केल्या आहेत. बिहारमधील व्हीआयपी आमदाराच्या मृत्यूनंतर बोचहान विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आरजेडीने विजय मिळवला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या ओसनसोल लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय नोंदवला आहे. बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी 19904 मतांनी ( Babul Supriyo byelection result ) विजय मिळवला. छत्तीसगडमधील खैरागड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोदा वर्मा विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या जयश्री विजयी ( Jayashri Jadhav won in election ) झाल्या आहेत.

शत्रुघ्न सिन्हा यांनी निवडणूक ( Shatrughan Sinha bypoll election result ) जिंकली: पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातील टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी जवळपास दोन लाख मतांनी निवडणूक जिंकली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांचा २ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी 19904 मतांनी विजय मिळविला. त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी, सीपीआयएम उमेदवार आणि नसीरुद्दीन शाह यांची भाची सायरा शाह यांचा पराभव केला.

कोल्हापुरातून काँग्रेस विजयी ( Utta Kolhapur bypoll result ) - उत्तर महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव केला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा जवळपास 19000 मतांनी पराभव केला. डिसेंबर 2021 मध्ये काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कोविड-19 मुळे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर 15 उमेदवार आपले नशीब आजमावत होते.

बिहारच्या बोचहा जागेवर आरजेडी ( Bihar bypoll result ) - बिहारच्या बोचहा जागेवरून आरजेडीचे उमेदवार अमर पासवान विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या बेबी कुमारी यांचा पराभव केला आहे. बिहारच्या बोचहा विधानसभा जागेवर आरजेडीचे अमर पासवान यांनी भाजपच्या बेबी कुमारी यांचा ३६६५३ मतांनी पराभव केला. आमदार मुसाफिर पासवान यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर तेरा उमेदवार रिंगणात होते. त्यात तीन महिला होत्या.

खैरागडमध्येही काँग्रेसचा विजय ( Khairagadh bypoll election result ) -छत्तीसगडच्या खैरागड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार यशोदा वर्मा यांनी सुमारे 20 हजार मतांनी विजय मिळविला आहे. येथे भाजपच्या उमेदवार कोमल जांघेल यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जनता काँग्रेसचे आमदार देवव्रत सिंह यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवरही 10 उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा-300 Units Free in Punjab : पंजाबमधील प्रत्येक घराला मिळणार 300 युनिट मोफत वीज - मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा

हेही वाचा-MAN KILLS WIFE : जेवणात जास्त मीठ टाकल्याने संतापलेल्या पतीने केली पत्नीची हत्या

हेही वाचा-108 FT Statue of Hanuman : गुजरातमध्ये उभारण्यात आला हनुमंताचा 108 फूट उंच पुतळा...पंतप्रधानांकडून अनावरण

Last Updated : Apr 16, 2022, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.