गांधीनगर - गुजरात विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या सर्व ८ जागांवरील पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवत आपले वर्चस्व राखले आहे. काँग्रेस मुस्लिम बहुसंख्य असलेल्या आपल्या परंपरागत अबडासा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. मुख्यमंत्री रुपाणी यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे स्पष्ट नाकारले असून प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे, की कोणत्याही काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
गुजरातमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस अबडासा, गढडा, लींबडी, मोरबी, धारी, करजण, कपराडा व डांग या सर्व जागांवर पराजित झाली. या विजयाचा लाभ भाजपला आगामी 33 जिला परिषद, जवळपास 150 नगर पालिका व 6 महानगर पालिका निवडणुकांमध्ये होऊ शकतो. कच्छच्या अबडासा जागेवर काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. येथे भाजपा व काँग्रेस उमेदवारांमध्ये मतांचे अंतर 36,778 इतके राहिले. याप्रकारे तरह कपराडा, धारी, करजण, डांग मतदारसंघातही भाजपने १० ते २५ हजार मतांच्या अंतराने विजयी झाले.
गुजरात विधानसभेत भाजपाचे संख्याबळ आता १११ झाले.
विधानसभेत पक्षीय बलाबल -
- भाजपा – 111
- काँग्रेस – 65
- भारतीय ट्रायबल पार्टी - 2
- अपक्ष – 1
- एनसीपी – 1
खालील जागांवर भाजप विजयी -
- अबडासा – कच्छ
- गढडा (एससी) – सौराष्ट्र
- लींबडी – सौराष्ट्र
- मोरबी – सौराष्ट्र
- धारी – सौराष्ट्र
- करजण –वडोदरा मध्य गुजरात
- कपराडा (आदिवासी बहुल)
- डांग (एसटी) आदिवासी बहुल