ओमर अब्दुल्ला हे बैठकीतून बाहेर आले आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रमंचचे संस्थापक अध्यक्ष यशवंत सिन्हा हे पत्रकार परिषद घेणार आहेत. बैठकीला घनश्याम तिवारी, जयंत चौधरी यांचीही उपस्थिती होती.
शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली बैठक नव्या आघाडीसाठी नव्हती - यशवंत सिन्हा - Rashtramanch meeting
17:21 June 22
17:16 June 22
ओमर अब्दुल्ला बैठकीतून बाहेर
16:34 June 22
राष्ट्रमंचच्या बैठकीवर रामदास आठवलेंनी ही दिली प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कितीही आघाडी स्थापन झाल्या तरी ते एकच नंबर राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री तर आरबीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे.
16:33 June 22
गीतकार जावेद अख्तर यांच्यासह यशवंत सिन्हादेखील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल
तृणमूल पक्षाचे नेते यशवंत सिन्हा, गीतकार जावेद अख्तर, राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हे शरद पवार यांच्या निवासस्थांनी पोहोचले आहेत.
16:28 June 22
लोकांना बदल हवा आहे- सीपीआयचे खासदार विनोय विश्व
सीपीआयचे खासदार विनोय विश्व हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांच्या बैठकीसाठी पोहोचले आहेत. हे व्यासपीठ सर्वात तिरस्कार असलेल्या अपयशी सरकारविरोधात असलेल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही डाव्या शक्तींचे आहे. देशाला बदल हवा आहे. लोकांना बदल हवा आहे.
16:08 June 22
शरद पवारांच्या निवासस्थानी विविध विरोधी पक्षनेत्यांची हजेरी
नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठकी ही नव्या आघाडीसाठी नव्हती, असे राष्ट्रमंचचे संस्थापक अध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राष्ट्रमंचच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी त्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ही बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नव्हे राष्ट्रमंचने बोलाविल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसच्या नेत्यांना डावलले नाही. त्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे नेते अभिषेक संघवी इत्यादींनी काही कारणास्तव येणार नसल्याचे कळविले आहे. अडीच तास बैठकीत महागाई, कोरोना परिस्थिती, इंधन दरवाढ अशा विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आल्याचे माजीद मेमन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल कॉंग्रेसचे यशवंत सिन्हा हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत लढण्यासाठी व तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करण्यासाठी मंगळवारी विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली होती. ही बैठक सुमारे पाऊण तास चालली आहे.