ETV Bharat / bharat

LIVE : हिवाळी अधिवेशन 2021 - विधानपरिषद कामकाजाचे अपडेट - Vidhan Parishad live page

LIVE : हिवाळी अधिवेशन 2021 - विधानपरिषद कामकाजाचे अपडेट

author img

By

Published : Dec 27, 2021, 11:50 AM IST

Updated : Dec 27, 2021, 1:18 PM IST

12:20 December 27

मुंबई - प्रविण दरेकर मलाड मढ - आयलंडमध्ये 830 नकाशे बोगस आहेत. तसेच, अनेक भूमी अभिलेखात छेडछाड करण्यात आली आहे. यातील दोषींवर कारवाई कधी करणार असा प्रश्न दरेकर यांनी विचारला आहे. यावर उत्तर देताना मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती तपासून पाहता दोषींवर कारवाई करण्यात येईल अस उत्तर थोरात यांनी दिली आहे. 102 ठिकाणी फेरफार झाली आहे. एक महिन्यांच्या आत आयुक्तांमार्फत कारवाई करणार अस थोरात म्हणाले. यावर प्रवीण दरेकर यांनी भूमी अधिलेख विभागाचे उपअधीक्षक, वॉर्ड अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा अशी विनंती केली. त्यावर मंत्री थोरा आतापर्यंत छेडछाड केलल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल अस उत्तर दिले.

12:02 December 27

मुंबई - विनायक मेटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत हेळसांड होत आहे. याबाबत कोणतीही लाज-शरम वाटत नाही अस मेटे यावेळी म्हणाले आहेत. ते विधानपरिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. दोन वर्षात स्मारकाबद्दल काहीही प्रगती नाही. अधिकारी, सचिव, नोकरदार वर्गाने सर्वांना अंधारात ठेवले आहे. अशोक चव्हाण यांनाही यामध्ये दूर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार समिती नेमली आहे. केवळ निविदा काढायच्या अन सातत्याने निधी आणि मुदतवाढ मागायचा प्रकार सुरू करायचे हे बरोबर नाही. यावर मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री काय कारवाई करणार? असा प्रश्न मेटे यांनी यावेळी विचारला आहे. यावर उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी शिवाजी महाराज महाराष्ट्रचे आराध्य दैवत आहेत. आणि याबाबत स्मारक झाले पाहिजे ही सर्वांची एकच भूमिका आहे. त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. स्मारक अरबी समुद्रात तातडीने उभे राहायला हवे. मात्र, कोरोनाची परिस्थित असल्यामुळे कामात खंड पडला आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्यात येत आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने ते न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाकडून त्यावर जेव्हा योग्य निर्णय येईल तेव्हा हे काम सुरळीत सुरू होईल अस उत्त मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

11:54 December 27

मुंबई - आमदार सुधीर तांबे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या काही शाळा कागदपत्रांअभावी वर्ग तुकड्यात विलीन होत नाही. 30 दिवसांच्या आत संमती देण्याची शिफारस असताना 7 महिने पात्रतेचा निकष दिलेले नाहीत. विनाकारण त्रुटींमुळे शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो. राज्य शासनाने तत्काळ चौकशी करावी अशी आपल्या प्रश्नात विनंती केली. यावर उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी वित्त विभागाशी चर्चा करून ज्यांनी त्रुटी पूर्ण केल्या आहेत त्यांचा प्रस्ताव तत्काळ मार्गी लावला जाईल अस उत्तर दिले आहे.

10:47 December 27

LIVE : हिवाळी अधिवेशन 2021 - विधानपरिषद कामकाजाचे अपडेट

मुंबई - अकोला महामार्गाच्या दुरुस्ती काम सुरू असताना उभरलेल्या डांबर निर्मिती प्लांटचा स्फोट झाला. निष्पाप कामगारांचा जीव गेला. संबंधित दोषीं कारवाई करावी करावी अशी मागणी विनायक मेटे यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. यावर मंत्री बच्चू कडू यांनी यावर उत्तर देताना ही घटना दुर्दैवी आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या जातील. तर, अकोला दुर्घटनेप्रकरणी ईगल इन्फ्रा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करू असे आश्वासन दिले आहे. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येईल असही कडू यांनी जाहीर केले आहे.

Last Updated : Dec 27, 2021, 1:18 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.