ETV Bharat / bharat

दुसऱ्या लाटेत या छोट्या योद्ध्यांची कोरोनावर मात; 25 दिवसाचा चिमुकलाही यशस्वीपणे लढला

लहान बालकांनाही कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात होत आहे. गुजरातमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 411 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

दुसऱ्या लाटेत बालकांची कोरोनावर मात
दुसऱ्या लाटेत बालकांची कोरोनावर मात
author img

By

Published : Apr 28, 2021, 10:42 AM IST

अहमदाबाद - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. यात लहान बालकांनाही कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात होत आहे. गुजरातमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 411 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात नवजात बालकांपासून 12 वर्षांच्या बालकांचा समावेश आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस गंभीर रुग्णसंख्येत भर पडत आहे. त्यात काही बालकांचा समावेश असून, त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ही बालके कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले आहेत. यामध्ये एका 25 दिवसाच्या बालकाचाही समावेश आहे. त्या चिमुकल्याने उपचार घेऊन कोरोना विरुद्ध यशस्वी लढा देत मात केली आहे.

आईचे दूधही पाजले नाही-

सुरत शहरात एका 25 दिवसाच्या नवजात बालकाने कोरोनाला हरवले आहे. त्या बालकाचे वडील रुबेन डॅनियल यांना कोरोना झाला होता. त्यानंतर दोन दिवसात त्यांची आई आणि पत्नीही कोरोना संक्रमित झाले. परिणामी त्यांच्या संपर्कात असलेल्या नवजात बालकालाही कोरोनाने घेरले. आईला कोरोना झाला असल्याने त्या बालकाला दूध पाजले नाही. मात्र नियमाचे पालन आणि योग्य उपचरांती त्या बालकास कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश मिळाले. त्यामुळे ते बालक आता सुरक्षित आहे. अशाच प्रकारे अनेक बालकांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.

माझा मुलगा झुंझार आहे-

शिवेन शाह हा तीन वर्षाचा मुलगा देखील कोरोनाबाधित झाला होता. त्याने देखील कोरोनावर मात केली आहे. याबाबत त्याचे वडील मृगेश शाह म्हणाले की, जेव्हा माझा मुलगा कोरोनाबाधित झाला , त्यावेळी त्याला विलगिकरणात ठेवण्यात आले. तत्काळ योग्य ते उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर तो एकदम ठणठणीत झाला आहे, तो एक झुंजार मुलगा असल्याची भावना शाह यांनी व्यक्त केली.

तापाने फणफणत होती चिमुकली

कोरोनावर मात करणाऱ्या 2 वर्षीय चिमुकल्या जस्मीनचा लढाही तसाच आहे. याबाबत तिचे वडील सागर म्हणाले की, माझ्या दोन वर्षाच्या मुलीला ताप आला होता. त्यामुळे ती खेळताना खाली पडत होती आणि ताप देखील कमी होत नव्हता, त्यामुळे आम्ही तिची कोरोना चाचणी केली. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आम्ही तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. अखेर उपचरांती या चिमकुल्या मुलीने कोरोनावर मात केली.

1 वर्षीय त्रिशाची कोरोनावर मात

एक वर्षीय त्रिशा चांचडिया हिला कोरोनाची बाधा झाली. तसेच तिचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. त्रिशाची परिस्थिती गंभीर झाली होती. ती औषध देखील पिऊ शकत नव्हती. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार घेत अत्यवस्थ झालेल्या त्रिशाने कोरोनाला चीतपट केले आहे.

अडीच वर्षीय विवानही ठणठणीत

अडीच वर्षीय विवान गोंदालिया याला कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्याला सलग दोन दिवस ताप येत होता. त्यामुळे तो औषधांचा जास्त डोस घेऊ शकणार नाही, अशी शंका त्याच्या पालकांना होती. मात्र 5 दिवस रुग्णालयात भरती करून त्याला इंजेक्शन देण्यात आले. त्या माध्यमातून विवानने उपचारास साथ देत कोरोनावर मात केली आहे.

तर बालकास रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज

कोरोना संक्रमित बालकांवर उपचार करणारे डॉ. पुरवेश ढाकेचा म्हणाले, की कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले जास्त संक्रमित होत आहेत. कोरोना पासून बचाव करण्यासाठी मुलांना डॉक्टर ताप आल्यास पॅरासिटामॉल आणि काही औषधे देतात, मात्र अत्यवस्थ असलेल्या बालकास रेमडेसिवीर हे इंजेक्शन द्यावे लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.