नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ अद्याप अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये अधिकची गुंतवणूक करण्याचा विचार करत नसल्याचे स्पष्ट करणयात आले आहे. हा स्टॉकच्या किंमती पूर्वीपेक्षा स्वस्त झाल्यांने कंपनीला नुकसान होत आहे. सध्या जवळपास ४० टक्के स्वस्तात स्टॉक उपलब्ध आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एलआयसीने अधिक गुंतवणुक अदानी समूहाच्या समभागांमध्ये करणार नसल्याची घोषणा केली आहे. आदानी समुहाचे शेअर आणखी घसरण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर मोठा आर्थीक फटका बसला आहे. त्यामुळे एलआयसी धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
शेअर्समध्ये घसरण : या संदर्भात एका खाजगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत एलआयसीचे अध्यक्ष एम.आर. कुमार म्हटले आहे की, आम्ही सध्या कोणतीही गुंतवणुक करण्याच्या विचारात नाही. कमी कालावधीत शेअर्समध्ये घसरण झाल्याने एलआयसी हा निर्णय घेतल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले की, अदानी समुहातील गुंतवणुकी संदर्भात सध्या कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. तसेच माझ्याकडे खुप कमी वेळ असल्याने गुंतवणुकीसंदर्भात निर्णय घेणे अवघड असल्याचे कुमार यांनी सांगितले आहे.
अदानी समूहात एलआयसीची 30 हजार 127 कोटींची गुंतवणुक : एलआयसीने केल्याल्या गुंतवणुकीमुळे संसदेतही चांगलाच गदारोळ बघायला मिळाला होता. अदानी समुहाच्या मुद्यावर विरोधकांनी सरकारला संसदेत धारेवर धरले होते. एलआयसीने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एकूण 30 हजार 127 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यावर एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, अदानी समूहाच्या शेअर्सची घसरणीचा फटका गुंतवणुकीवर बसणार नाही.
हेही वाचा - Babasaheb Ambedkar Yatra: रेल्वेच्या आयआरसीटीसीची 'बाबासाहेब आंबेडकर यात्रा', आजच बुकिंग करा