श्रीनगर : लष्कर-ए-तैयबाच्या एका हायब्रीड दहशतवाद्याला ( LeT Hybrid Terrorist ) आज सकाळी बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी ( Kreri Area Baramulla ) भागातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती ( Jammu Kashmir Police ) दिली. लष्करच्या दहशतवाद्याकडून एक पिस्तूल, शस्त्रास्त्र, दारुगोळा, एक मॅगझिन आणि पिस्तूलच्या 7 राउंड जप्त करण्यात आल्याचे त्यांनी ( Weapons Seized From Terrorist ) सांगितले.
पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईदरम्यान हा दहशतवादी पकडला गेला. पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इक्बाल भट असून तो तिलगाम पेनचा रहिवासी आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, हा दहशतवादी दहशतवादी कारवायांना रसद पुरवण्यात सक्रियपणे सहभागी होता आणि सैफुल्लाह आणि अबू जरार या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता.
याआधीही सुरक्षा दलांनी हायब्रीड दहशतवाद्यांना पकडले आहे. राष्ट्रीय महामार्गावर आयडी हल्ला करण्यासाठी हा दहशतवादी रसायने आणि साहित्य पुरवण्यात गुंतला होता, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : भारत - पाकिस्तान सीमेजवळ बीएसएफची मोठी कारवाई.. ४ पाकिस्तानी मच्छीमारांसह १० बोटी पकडल्या