ETV Bharat / bharat

Man Stabs Hotelier : चहामध्ये साखर कमी ; ग्राहकाने हॉटेलमालकावर केला चाकूने हल्ला

केरळमधील तनूर येथे कमी साखरेचा चहा दिल्याने ( less Sugar In Tea Malappuram ) एका तरुणाने हॉटेल मालकावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील टीए रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. गंभीर जखमी मनफला कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ( Kozhikode Medical College Hospital ) दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी सुबैरला ताब्यात घेतले आहे.( Man Stabs Hotelier In kerala )

shopkeeper was attacked with a knife
दुकानदारावर चाकूने हल्ला
author img

By

Published : Jan 4, 2023, 1:34 PM IST

मलप्पुरम ( केरळा ) : मलप्पुरम जिल्ह्यात मंगळवारी एका दुकानदारावर चहाच्या कारणानरून संतप्त झालेल्या ग्राहकाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मलापुरममधील तनूर येथे घडली, जिथे मुनाफ एक छोटा चहाचा स्टॉल चालवत होता, जेव्हा एका ग्राहक सुबैरने चहामध्ये कमी साखरेवरून मुनाफशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि वाद वाढला आणि त्याला धक्काबुक्की करण्यात आली. ( Man Stabs Hotelier In kerala )

मुनाफवर चाकूने वार : चहा स्टॉलचा कर्मचारी म्हणाला चहा दिल्यानंतर सुबैरने साखर कमी असल्याची तक्रार केली, त्यानंतर त्याला राग येऊ लागला, मुनाफने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण सुबैरचा राग वाढतच गेला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली, काही वेळाने सुबैर निघून गेला. मात्र नंतर तो परत आला आणि त्याने मुनाफवर चाकूने वार करून पळ काढला. ( In kerala Man Stabs Hotelier )

आरोपी सुबैर कोठडीत : रक्ताने माखलेल्या मुनाफला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्याची प्रकृती पाहता अखेर मुनाफला कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ( Kozhikode Medical College Hospital ) नेण्यात आले, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुबैरला ताब्यात घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.