ETV Bharat / bharat

आसाम: पोलिसांसमोर मृतदेहाला तुडविणाऱ्या निर्दयी फोटोग्राफरला अटक

कारवाईदरम्यान आणलेल्या फोटोग्राफरने वेगळाच प्रताप केला आहे. पोलिसांच्या कारवाईत नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर फोटोग्राफरने त्याचा मृतदेह हा तुडविला. कारवाईत दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

विजय बनिया
विजय बनिया
author img

By

Published : Sep 24, 2021, 5:03 PM IST

गुवाहाटी- आसाममधील दररंग जिल्ह्यातील गोरुखुटी येथे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना धक्कादायक प्रकार घडला आहे. कारवाईदरम्यान उपस्थित असलेल्या फोटोग्राफरने एक नागरिकाच्या मृतदेहाला लाथेने तुडविले. या निर्दयी फोटोग्राफरला पोलिसांनी अटक केली आहे.

विजय बनिया असे अटकेतील फोटोग्राफरचे नाव आहे. दररंग जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची कारवाई करताना पुरावा म्हणून या फोटोग्राफरला काम दिले होते. हा फोटोग्राफर मृतदेहाला लाथेने मारत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये बनेल आणि लुंगी घातलेल्या नागरिकाच्या फोटोग्राफर धावत असल्याचे दिसते. त्यावेळी पोलीस त्या नागरिकाला घेराव घालून काठीने मारतात. त्यानंतर नागरिकाचा मृतदेह खाली पडल्याचे दिसते.

हेही वाचा- महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल; तपासाला केली सुरुवात

फोटोग्राफरच्या हिंसक वागणुकीचे कारण काय?

आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महांता म्हणाले, की विजयला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास करण्यासाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फोटोग्राफरच्या हिंसक वागणुकीचे कारण पोलीस शोधत आहेत. घटनास्थळी पोलीस नियंत्रणात येण्यासाठी कारवाई करत होते.

हेही वाचा-पंतप्रधान मोदी सहभागी होत असलेल्या 'क्वाड देशांची बैठक' नेमकी काय आहे? जाणून घ्या..

दोन नागरिकांचा मृत्यू तर सुरक्षा दलाचे 10 जवान जखमी

धालपूर परिसरात सिपजाहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अतिक्रमण आहे. या अतिक्रमणावर नागरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा दलाच्या उपस्थित कारवाई केली आहे. या कारवाईत दोन नागरिकांचा मृत्यू तर सुरक्षा दलाचे 10 जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार 77420 बिघा सरकारी जमिनीवर दोन दशकांपासून स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे.

हेही वाचा-धक्कादायक! दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच गोळीबार; कुख्यात गुन्हेगारासह तिघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.