नवी दिल्ली - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोव्यात पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी दिल्लीतून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारींची यादी जाहीर ( BJP Candidates for Goa Assembly Election) करत आहेत. उत्पल पर्रिकरांना तिकीट मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गोव्यात भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळीममधून निवडणूक लढवणार -
भाजपने गोवा निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांची घोषणा केली असून त्यात उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांचाही समावेश असून ते मरगावमधून निवडणूक लढवणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळीमधून निवडणूक लढवणार आहेत.
'उत्पल पर्रिकरांना दोन पर्याय दिले'
पणजीतून मोनसेरात यांना तिकीट मिळाले आहे. तर उत्पल पर्रिकरांना दोन पर्याय दिले होते, त्याबद्दल त्यांच्याशी विचारणा चालू आहे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अनेकांचे पत्ते कट, उत्पल पर्रिकराच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष -
भाजपने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री दीपक पावसकर अशा दिग्गजांचा पत्ता कट केला आहे. पणजीची उमेदवारी बाबूश मोंसरात यांना देण्यात आल्यामुळे उत्पल पर्रिकर कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पणजीची उमेदवारी बाबूश मोंसरात -
भारताचे लक्ष लागून राहिलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची भाजपाने यादी घोषित केली. अखेर पणजीतून उत्पल पर्रीकर यांचा पत्ता कट करण्यात आले आहे. भाजपने आपली पहिली यादी घोषित केली आहे, आणि अखेर राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पणजीची उमेदवारी बाबूश मोंसरात यांना देण्यात आली आहे.